नवी दिल्ली । देशात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळं शैक्षणिक वेळापत्रकावर परिणाम झाला आहे. अनेक परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. NEET व JEE परीक्षाही केंद्र सरकारनं पुढे ढकलली होती. अखेर ही परीक्षा घेण्यासाठी वेळापत्रक निश्चित करण्यात आलं असून, परीक्षा घेण्यावरून दोन गट पडले असल्याचं दिसत आहे. अनेक राज्यांनी नीट आणि जेईईची परीक्षा पुढे ढकण्याची मागणी केली आहे. तर केंद्र सरकार परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसार घेण्यावर ठाम आहे. दरम्यान, NEET आणि JEE परीक्षा विद्यार्थांनाचं हवी असल्याचे केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल यांनी म्हटलं आहे.
रमेश पोखरियाल यांनी याबातत बोलताना म्हटलं की, एनटीएच्या (NTA) संचालकांनी सांगितल्याप्रमाणे जेईईच्या 8.58 लाख विद्यार्थ्यांपैकी साडेसात विद्यार्थ्यांनी अॅडमिट कार्ड डाऊनलोड केलं आहे. तर नीटच्या 15.97 लाख विद्यार्थ्यांपैकी 10 लाख विद्यार्थ्यांनी अॅडमिट कार्ड गेल्या 24 तासात डाऊनलोड केलं आहे. याचा अर्थ विद्यार्थ्यांना परीक्षा हवी आहे. कोणत्याही परिस्थितीत परीक्षा व्हावी ही विद्यार्थांची इच्छा आहे, असं पोखरियाल यांनी म्हटलं.
विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा विचार करत परीक्षा केंद्रांची संख्या आता 570 वरुन वाढवून 660 करण्यात आली आहे. तर नीट परीक्षेच्या विद्यार्थांसाठीच्या परीक्षा केंद्रांची संख्या 2546 वरुन 3842 करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीचे परीक्षा केंद्र मिळावे यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे, असंही रमेश पोखरियाल यांनी सांगितलं.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”