रिलायन्सच्या कर्मचाऱ्यांना कुटुंबियांसहित मिळणार मोफत लस ; नीता अंबानी यांची मोठी घोषणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशभरात थैमान घालणाऱ्या कोरोनाच्या लसीकरण मोहिमेला सुरुवात झालेली आहे. लसीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यालादेखील 1 मार्चपासून सुरुवात झाली आहे. आता सर्व खाजगी रुग्णालयातही लस उपलब्ध होणार आहे. दरम्यान लसीकरणासंदर्भात रिलायन्स फाऊंडेशनच्या संस्थापक अध्यक्ष नीता मुकेश अंबानी यांनी मोठी घोषणा केली आहे. रिलायन्स कंपनीतील सर्व कर्मचाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबाच्या वॅक्सीनेशनचा सर्व खर्च स्वत: करणार आहेत. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये दिलासादायक वातावरण आहे.

कोरोनावर लवकरच आपण सर्वजण मात करूच परंतु तोपर्यंत काळजी घेणे गरजेचे आहे. हे लढाई आता शेवटच्या टप्प्यात आहे. मी आणि मुकेश अंबानी यांनी निर्णय घेतला की, आम्ही रिलायन्सच्या सर्व कर्मचाऱ्यांना आणि कुटुंबातील सदस्यांना विनामूल्य वॅक्सीन देणार आहे. अशी माहिती नीता अंबानी यांनी दिली आहे.

नीता अंबानी म्हणाल्या, आपल्या कुटुंबाचे आरोग्य आणि आनंदाची कदर करणे म्हणजेच एखाद्या कुटुंबाचा-रिलायन्स कुटुंबाचा भाग असणे आहे, ‘तुमच्या पाठिंब्यामुळे, आपण लवकरच या पँडेमिकला मागे सोडू. तोपर्यंत निराश होऊ नका. अधिकाधिक सुरक्षा आणि स्वच्छतेची खबरदारी घेणे सुरू ठेवा. आपण या सामुहिक लढाईच्या शेवटच्या टप्प्यात आहोत.

ज्या कर्मचाऱ्यांना वॅक्सीन घ्यायचे आहे. त्यांनी सरकारी पोर्टलवर नोंदणी करावी. जेणेकरून आपण कोरोनावर लवकरात लवकर मात करू शकू असे आवाहन देखील नीता अंबानी यांनी कर्मचाऱ्यांना केले आहे. लसीकरणाचा दुसरा टप्पा 1 मार्चपासून सुरू झाला आहे. त्यात 45-60 या वयोगटातील नागरिकांना लसीकरण केले जाणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘hello news’

Leave a Comment