हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । टी-20 विश्वचषक 2024 स्पर्धा (T20 World Cup 2024) उद्यापासून सुरु होणार आहे. यंदाची टी-20 वर्ल्डकप अमेरिका आणि वेस्ट इंडिज मध्ये आयोजित करण्यात आल्याने भारतीय प्रमाणवेळेनुसार, 2024 टी-20 विश्वचषकाचा पहिला सामना उद्या सकाळी 6 वाजता होणार आहे. एकूण २० संघ या विश्वचषक स्पर्धेत उतरले असून काहीही करून वर्ल्ड्कप जिंकायचाच असा चंग सर्वच संघानी बांधला आहे. भारत, वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड हे संघ विजयाचे दावेदार मानले जात आहेत. मात्र तत्पूर्वी ऑस्ट्रेलियाचा माजी यष्टीरक्षक फलंदाज ऍडम गिलख्रिस्टने (Adam Gilchrist) एक मोठं विधान केलं आहे. नेपाळ आणि नेदरलँड्स हे २ संघ यंदाच्या वर्ल्डकप मध्ये मोठा उलटफेर करू शकतात असं गिलीने म्हंटल आहे.
गिलख्रिस्ट म्हणाला, या विश्वचषक स्पर्धेत नेपाळ आणि नेदरलँड्स हे २ संघ बांगलादेश आणि श्रीलंका यांसारख्या संघांविरुद्ध आश्चर्यकारक निकाल देऊ शकतात. नेपाळ आणि नेदरलँड्सला बांगलादेश, दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंकेसह ड गटात ठेवण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळल्यामुळे नेपाळचा संघ अधिक मजबूत झाला आहे. नेपाळ कडे असे काही खेळाडू आहेत जे गेल्या काही वर्षांपासून मोठ्या लीगमध्ये सातत्याने खेळत आहेत. त्यामुळे नेपाळचा संघ चांगली कामगिरी करू शकतो असा विश्वास ऍडम गिलख्रिस्टने व्यक्त केला.
दुसरीकडे, 2022 मध्ये ऑस्ट्रेलियात खेळल्या गेलेल्या T20 विश्वचषक स्पर्धेत नेदरलँड्सने बलाढ्य दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून क्रिकेटविश्वास सनसनाटी निर्माण केली होती. हाच धागा पकडून गिलख्रिस्ट म्हणाला, “नेदरलँड्स संघ नेहमीच आव्हान निर्माण करतो, त्यामुळे या संघाला पराभूत करणे सोपे नाही.आताही नेदरलँड दक्षिण आफ्रिकेच्या गटात आहे त्यामुळे यंदाही नेदरलँडचा संघ आफ्रिकेला कडवं आव्हान देईन असं गिलीला वाटत.
टी20 विश्वचषकासाठी नेपाळ संघ:
रोहित पौडेल (कर्णधार), दीपेंद्र सिंग आयरी, आसिफ शेख, अनिल कुमार साह, कुशल मल्ला, ललित राजबंशी, करण केसी, गुलशन झा, सोमपाल कामी, प्रतिस जीसी, संदीप जोरा, अविनाश बोहरा, सागर ढकल, कमलसिंग आयरी.
टी20 विश्वचषकासाठी नेदरलँडचा संघ-
स्कॉट एडवर्ड्स (कर्णधार), आर्यन दत्त, बास डी लीडे, काइल क्लेन, लोगन व्हॅन बीक, मॅक्स ओडॉड, मायकेल लेविट, पॉल व्हॅन मीकरेन, साकिब झुल्फिकार, सिब्रांड एंजलब्रेक्ट, तेजा निदामनुरु, टिम प्रिंगल, विक्रम सिंग, विव किंग्मा, वेस्टी बॅरेसी.