नेपाळमध्ये भारतीय वृत्तवाहिन्यांवर अघोषित बंदी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । नेपाळमध्ये राजकीय संकट निर्माण झाले असताना त्याचा राग भारतीय वृत्तवाहिन्यांवर काढण्यात येत आहे. नेपाळमध्ये भारतीय वृत्तवाहिन्यांवर अघोषित बंदी घालण्यात आली असून यातून दूरदर्शनला वगळण्यात आले आहे. या बंदीतून दूरदर्शनला वगळण्यात आले आहे.

नेपाळचे पंतप्रधान के.पी शर्मा ओली यांच्याबद्दल भारतीय वृत्तवाहिन्यांवर चुकीच्या बातम्या प्रसारीत करून त्यांची प्रतिमा डागळण्यात आली असल्याचा आरोप करण्यात आला आहे. भारतीय वृत्तवाहिनींवर बंदी घालण्याचा निर्णय नेपाळमधील केबल ऑपरेटर संघटनेने घेतला असल्याचे समजते. याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा, आदेश नेपाळ सरकारच्यावतीने काढण्यात आले नाहीत.

नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी भारतविरोधी भूमिका घेतल्यानंतर त्यांच्याविरोधात सत्ताधारी नेपाळी कम्युनिस्ट पक्षात वातावरण तयार झाले आहे. ओली यांनी राजीनामा द्यावा यासाठी पक्षातंर्गत मागणी करण्यात येत आहे. तर, दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादाच्या आधारे पंतप्रधान केपी शर्मा ओली आपल्या अपयशावर पांघरूण घालत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. दरम्यान, भारतविरोधी भूमिका घेणाऱ्या नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांची सत्ता वाचवण्यासाठी नेपाळमधील चिनी राजदूतांचा हस्तक्षेप सुरू आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment