Nepal Plane Crash: टेक ऑफ करताना विमान कोसळलं!! समोर आला धडकी भरवणारा व्हिडीओ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Nepal Plane Crash: सध्या नेपाळ येथून एक महत्वाची बातमी हाती आली असून नेपाळची राजधानी काठमांडू येथून प्रवाशांना घेऊन जाणारं विमान कोसळलं आहे. काठमांडूतील त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर बुधवारी सौर्य एअरलाइन्सचे विमान उड्डाण घेत असताना हा अपघात झाला. मिळालेल्या माहितीनुसार सकाळी 11 वाजताच्या सुमारास कोसळलेल्या पोखराला जाणाऱ्या विमानात फ्लाइट क्रूसह 19 लोक होते. या अपघाताची माहिती वृत्त संस्था ANI कडून देण्यात आली असून याबाबतचा एक व्हिडीओ सुद्धा प्रसारित (Nepal Plane Crash) करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अपघातस्थळावरून 15 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. अपघातानंतर विमानाचा कॅप्टन मनीष शाक्य यांच्यासह दोघांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. अपघातस्थळी तैनात असलेले वरिष्ठ पोलीस अधीक्षक डंबर बीके यांनी सांगितले की, विमानातील सर्व १९ जण सौर्य एअरलाइन्सचे (Nepal Plane Crash) कर्मचारी होते.

नक्की काय घडले ? (Nepal Plane Crash)

काठमांडू पोस्टच्या वृत्तानुसार, राजधानीच्या त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर सौर्य एअरलाइन्सच्या विमानाला आग लागल्याने ही दुःखद घटना घडली.विमानतळाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टेकऑफच्या वेळी विमान धावपट्टीवरून घसरले, परिणामी हा अपघात झाला. हे विमान काठमांडूहून पोखराला जात होते आणि त्यात एकूण १९ जण होते.

घटनेनंतर आकाशात धुराचे लोट

स्थानिक सूत्रांनी सांगितले की, अपघातानंतर विमानाला आग लागली आणि आकाशात धुराचे प्रचंड लोट पसरले. अपघातामुळे विमानाला लागलेली आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांचे पथक तैनात करण्यात आले आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी (Nepal Plane Crash) अग्निशमन दल आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांचे पथक कार्यरत आहे.