हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Nepal Protests। भारताचा शेजारी देश असलेला नेपाळ मोठ्या भीषण संकटात आहे. नेपाळच्या संसदेत हजारो तरुण मुले शिरली आहेत. तरुणांकडून मोठ्या प्रमाणावर निदर्शने केली जात आहेत. या तरुण आंदोलकांना रोखण्यासाठी पोलिसांना अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. पोलिसांनी आंदोलकांवर फायरिंग सुद्धा केली. या गोळीबारात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे बोललं जात आहे. नेपाळ सरकारने अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर बंदी घातल्याच्या पार्श्वभूमीवर हा सगळा राडा झाल्याचं बोललं जात आहे.
देशातील जनता सरकारवर नाराज – Nepal Protests
नेपाळचे पंतप्रधान केपी ओली यांनी ४ सप्टेंबरपासून देशात सोशल मीडिया अॅप्सवर बंदी घातली आहे. नेपाळ सरकारने 4 सप्टेंबरला फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब, वॉट्सऐप, रेडिट आणि X सारख्या 26 सोशल मीडिया ऐप्सवर बंदी घातली आहे. या बंदीचे मोठे पडसाद आज नेपाळ मध्ये पाहायला मिळाले. सोशल मीडियाच्या बंदीमुळे शिक्षण आणि व्यवसाय प्रभावित होत आहे असे या तरुण आंदोलकांचे म्हणणं आहे. आधीच नेपाळ मध्ये बेरोजगारी, भ्रष्टाचार आणि आर्थिक मंदीवरून सरकार वर नाराजी आहे. त्यात आता सरकारने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म बंद केल्याने खास करून युवकांमध्ये संताप उसळला. या बंदीविरोधात राजधानी काठमांडूसह अनेक शहरांमध्ये हजारो Gen-Z तरुणांनी हिंसक निदर्शने केली. यादरम्यान शेकडो तरुण नेपाळच्या संसदेत घुसले.आंदोलकांनी पोलिसांचे बॅरिकेड्स तोडून आणि गेट ओलांडून न्यू बानेश्वर येथील संघीय संसद परिसरात घुसखोरी केली. Nepal Protests
या एकूण परिस्थितीमुळे संपूर्ण देशभरात मोठा गोंधळ उडाला आहे. पोलिसांनी संपूर्ण परिसरात संचारबंदी लागू केली आहे. नेपाळी वृत्तपत्र ‘रिपब्लिका’नुसार, तरुण आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला आणि डझनभर रबर बुलेटचा वापर केला. पोलिसांच्या कारवाईत एका आंदोलकांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर येत आहे. या निदर्शनाच्या पार्श्वभूमीवर काठमांडूमध्ये कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. काठमांडू डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन ऑफिसने संपूर्ण न्यू बानेश्वरमध्ये कर्फ्यू लावण्यात आला आहे . मुख्य जिल्हाधिकारी छाबीलाल रिजाल यांनी सेक्शनमध्ये 6 अंतर्गत दुपारी 12. 30 पासून लावलेला कर्फ्यू रात्री 10 वाजेपर्यंत असेल.




