हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मोकळ्या वेळेत आपण Netflix या OTT प्लॅटफॉर्म वर चित्रपट किंवा वेब सिरीज पाहून आपला वेळ घालवत असतो. परंतु जर तुमच्याकडे इंटरनेट नसेल किंवा आपण अशा ठिकाणी गेलो जिथे नेटवर्क चा प्रोब्लेमी आहे. तर मात्र आपला हिरमोड होऊ शकतो आणि इच्छा असूनही आपण चित्रपट पाहू शकत नाही. परंतु आता चिंता करण्याची गरज नाही. आता आम्ही तुम्हाला असं काहीतरी सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही इंटरनेट शिवाय सुद्धा Netflix वरून चित्रपट आणि वेब सिरीज पाहू शकता. चला तर मग याबाबत सविस्तर जाणून घेऊयात….
नेटफ्लिक्स ऑफलाइन मोडमध्ये चित्रपट, वेब सिरीज आणि माहितीपट पाहण्याची परवानगी देते. परंतु यासाठी, तुम्हाला जेव्हा तुमच्याकडे इंटरनेट असेल तेव्हा सदर चित्रपट किंवा वेब सिरीज डाउनलोड करावी लागेल. त्यानंतरच तुम्ही इंटरनेटशिवाय नेटफ्लिक्सवर मनोरंजनाचा आनंद घेऊ शकता. यासाठी तुम्हाला नेटफ्लिक्स ॲप ओपन करावे लागेल. त्यानंतर तुम्हाला डाउनलोड करायचा आहे ती वेब सीरिज किंवा चित्रपट निवडावी लागेल. आता तुम्हाला खालच्या बाजूला बाणाचे चिन्ह दिसेल. त्यावर टॅप करून तुम्ही सदर कंटेन्ट डाउनलोड करू शकता. एकदा डाउनलोड पूर्ण झाल्यावर, तुम्ही नेटफ्लिक्स ॲपच्या ‘डाउनलोड’ विभागात जाऊन डाउनलोड केलेले सर्व चित्रपट आणि वेब सीरिज इंटरनेट शिवाय अगदी आरामात पाहू शकता.
कायमस्वरूपी टिकत नाही डाउनलोड केला कन्टेन्ट
Netflix वर डाउनलोड केलेली वेन सिरीज किंवा चिंत्रपट कायमचा सेव होत नाही. Netflix काही काळानंतर ते काढून टाकते. वेगवेगळ्या चित्रपटांसाठी आणि वेब सीरिजसाठी हा काळ वेगळा असू शकतो. सहसा ते 2 दिवस ते 30 दिवसांपर्यंत तुम्ही सदर चित्रपट पाहू शकता. समजा तुम्ही तुमचे Netflix सदस्यत्व रद्द केले तर डाउनलोड केलेले चित्रपट आणि वेब सिरीज तुमच्या डिव्हाइसवरून काढून टाकले जातील. तुम्ही पुन्हा सदस्यत्व घेतल्यास, तुम्हाला ते पुन्हा डाउनलोड करावे लागतील.