जल व्यवस्थापन विषयाच्या उच्च शिक्षणासाठी जेऊरच्या रवीकिरणची नेदरलँडला निवड; आर्थिक मदतीसाठी केलं हे आवाहन

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | घरची परिस्थिती हालाकीची अशात परदेशातून शिक्षणाची संधी चालून आलेली. पण परिस्थिती बिकट असल्यामुळे शिक्षणाचा खर्च कसा पेलायचा? असा प्रश्न करमाळा तालुक्यातील जेऊर या छोट्याशा गावात राहणाऱ्या रविकिरण माने याला पडला. मात्र, आपल्याकडे असलेल्या प्रबळ इच्छाशक्ती आणि जिद्द यामुळे रविकिरणने सात हजार किलोमीटरचा प्रवास पार करण्याचा ठरवलं आहे. जल व्यवस्थापन विषयाचे शिक्षण घेण्यासाठी नेदरलँड्सला त्याची निवड झाली असल्याने तेथील शिक्षण पूर्ण करण्यासाठी रवीकिरणने मदतीचे आवाहन केले आहे.

नेदरलँड्स मधील IHE Delft या प्रतिष्ठीत संस्थेने त्याला Water Management and Governance या कोर्स साठी आमंत्रित केले आहे. रवीकिरण ला शिकून परत येऊन आपल्या भागातील पाण्याच्या गंभीर प्रश्नांवर काम करायचे आहे. पण या कोर्स साठी तब्बल ४० लाख एवढा खर्च येणार आहे. रवीकिरण ला आपल्या मदतीची गरज आहे. ही फक्त आपली मदत नसेल तर जल व्यवस्थापन क्षेत्रात grassroot leader उभे करण्यासाठी गुंतवणूक असणार आहे.

दरम्यान, विविध माध्यमातून शिक्षणासाठी पैसे उभे करण्याचा रविकिरण प्रयत्न करीत आहेत. त्यातील एक पर्याय म्हणजे एज्युकेश ऑनलाइन पद्धतीने क्राऊड फंड रेझिंग. मिलाप डॉट ऑगे या संकेतस्थळावरून उच्चशिक फंड रेझिंगसाठी त्याने आवाहन केले आहे. अधिक माहितीसाठी रविकिरण माने, १८९५६५६१००९ यावर संपर्क साधावा.

https://milaap.org/fundraisers/support-ravikiran-mane

रविकिरण माने यांनी मुंबईच्या टाटा इन्स्टिट्यूटमधून वॉटर मॅनेजमेंट याच विषयावर एम.एस्सी. केली आहे. पाण्याचे 1 व्यवस्थापनाचा सखोल अभ्यास नेदरलँडच्या विद्यापीठातून पूर्ण केल्यानंतर याद्वारे पाणी प्रश्नावर काम करण्याचा त्यांचा मनोदय न आहे. पाण्याचे व्यवस्थापन हा पाणीटंचाईवर उपाय आहे. याची दिशा या अभ्यासक्रमातून मिळू शकेल.असे रवीकिरणला वाटते.