विधानपरिषदेची उमेदवारी मी मागितलीच नव्हती, उलट मला नको, असं म्हणालो होतो- विनोद तावडे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध पार पडली असली तरी उमेदवारीच्या मुदद्यावरून भाजपमध्ये सुरू झालेली धुसफूस कायम आहे. भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे, राम शिंदे यांनी उमेदवारी नाकारल्यानंतर आपली नाराजी बोलून दाखवली आहे. खडसे यांनी तर आपल्यासोबत विनोद तावडे, चंद्रशेखर बावनकुळे,पंकजा मुंडे या सर्वांची विधानपरिषदेसाठी नाव फायनल झाली असताना राज्यातील नैत्रुत्वाने केंद्रात कुरापती करून आमची टिकत कापली असल्याचा आरोप केला होता. खडसेंच्या या आरोपानंतर बावनकुळे यांनी फारकत घेत मी उमेदवारी मागितलीच नव्हती असं म्हणत आधी काढता पाय घेतला होता. तर आता त्यांच्यापाठोपाठ राजकीय वर्तुळातील चर्चेत उमेदवारीची इच्छा बाळगून असलेले विनोद तावडे यांनी आपण उमदेवारी मागितली नसल्याच सांगत पक्षाची नाराजी ओढवून न घेणंच पसंत केलं आहे. तावडे यांनी एका न्यूज वेबसाइटशी बोलताना त्यांची भूमिका मांडली.

‘विधानसभेसाठी मला तिकीट नाकारण्यात आलं होतं हे खरं आहे. पण विधान परिषदेची उमेदवारी मी मागितलीच नव्हती. उलट मला नको, असं मीच सांगितलं होतं. त्यामुळं माझ्या नाराजीचा प्रश्नच उद्भवत नाही,’ असा खुलासा भाजपचे नेते व माजी मंत्री विनोद तावडे यांनी केला आहे. यावेळी त्यांनी खडसे, मुंडे यांच्या नाराजीबद्दलही त्यांनी भाष्य केलं. ‘एकनाथ खडसे यांना विधान परिषदेच्या तिकिटाची अपेक्षा होती. त्यामुळं त्यांची नाराजी स्वाभाविक आहे. मात्र, तिकीट नाकारलं म्हणजे पक्षानं सर्वस्वी दूर केलं असं होत नाही. एकनाथ खडसे किंवा पंकजाताई यांच्या कामाबद्दल भाजपच्या नेतृत्वाला आदरच आहे. त्यांना आज ना उद्या संधी मिळेल,’ असं तावडे म्हणाले.

‘विधानसभेच्या असेल किंवा आता विधान परिषदेच्या उमदेवारीबद्दल जे काही निर्णय झाले, ते भाजपच्या केंद्रीय मंत्रिमंडळानं घेतलेले आहेत. खरंतर फडणवीस व चंद्रकांत पाटील हे आम्हाला तिकीट मिळावं म्हणून आग्रही होते. मात्र, केंद्रीय संसदीय मंडळानं वेगळा निर्णय घेतला. त्यामुळं त्या दोघांनी मिळून आमचं तिकीट कापलं असं वाटत नाही,’ असं तावडे म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

Leave a Comment