संपूर्णपणे स्वदेशी बनावट असलेल्या ‘वंदे भारत एक्सप्रेस’ या ट्रेनला प्रवाशांचे चांगलीच पसंती मिळत आहे. अवघ्या देशभरातून या ट्रेनची मागणी होत आहे. म्हणूनच भारत सरकारकडून ‘वंदे भारत एक्सप्रेस’ या ट्रेनचा विस्तार देखील वेगाने होत आहे. अनेक मार्गावर ही सुपरफास्ट ट्रेन तयार करण्यात आली असून या ट्रेन बाबत आता एक नवीन अपडेट समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या 15 सप्टेंबरला झारखंड मधील जमशेदपूर इथून देशातील विविध राज्यांसाठी आणखी दहा वंदे भारत ट्रेनला हिरवी झेंडे दाखवणार असल्याची माहिती आहे. यामध्ये महाराष्ट्रासाठीही एक गाडी सुटणार असून पुणे- नागपूर गाडीचा सुद्धा यात समावेश असणार आहे.
नवीन सुरक्षा फीचर्ससह सुसज्ज
नव्याने रुळावर येणाऱ्या ट्रेनमध्ये कोणती कोणती वैशिष्ट्य असणार आहेत? याची माहिती आता आपण करून घेऊयात. या ट्रेनच्या आत मध्ये आवाज कमी येणाऱ आहे. या ट्रेनमध्ये नवीन कपलर् तंत्रज्ञान असणार आहे त्यामुळे ट्रेनचं वजन देखील कमी असणार आहे. शिवाय ही ट्रेन मजबूत असणार आहे. ट्रेनचे डबे आणि शौचालय अद्यावत करण्यात आले असून ट्रेनमध्ये अनेक नवीन सुरक्षा फीचर्स देण्यात आले आहेत. तर कर्मचाऱ्यांच्या बाबतीतही विशेष काळजी घेतली जाणार आहे कारण देखभाल करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र केबिन या ट्रेनमध्ये असणार आहे.
प्रवाशांची खास सोय
तुम्ही जर वंदे भारतच्या या नव्याट्याने प्रवास करणार असाल तर त्यामध्ये तुम्हाला सीटवरच यूएसबी चार्जिंग, रिडींग लाईटची सोय असणार आहे. याशिवाय मॉड्युलर बॅटरी डिस्प्ले पॅनल आणि सीसीटीव्ही देखील बसवण्यात आले आहेत. एसी प्रथम श्रेणीच्या डब्यात गरम पाण्याचा शॉवर तुम्हाला मिळणार आहे. तसेच वरच्या बर्थ वर जाण्यासाठी पायऱ्यांची नवी रचना देखील करण्यात आली आहे. याशिवाय सामान ठेवण्यासाठी जास्त जागा आणि दिव्यांग प्रवाशांसाठी वेगळा विशेष बर्थ असणार आहे.
या मार्गांचा समावेश
टाटानगर-पटना, वाराणसी -देवघर, टाटानगर- ब्रह्मपूर, रांची -गोड्डा, आग्रा- बनारस, हावडा- गया, हावडा -भागलपूर, दुर्ग- विशाखापट्टणम, हुबळी- सिकंदराबाद आणि पुणे- नागपूर या मार्गावर सुरु होणार नव्या वंदे भारत एक्सप्रेस.
लवकरच वंदे भारत स्लीपर येणार
कार चेअर असलेली ‘वंदे भारत’ सध्या विविध मार्गांवर धावत आहे. तर ‘वंदे भारत स्लीपर’ ट्रेनही लवकरच सुरू होणार असून येथे तीन महिन्यांमध्ये ही ट्रेन देखील प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि स्लीपर वंदे भारतच्या पहिल्या मॉडेलची झलक दाखवली असून बंगळुरूच्या बीईएमएल कारखान्यात वंदे भारत स्लीपर ट्रेन चा पहिला प्रोटोक मॉडेल बनवून पूर्ण झाला आहे. या ट्रेनचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.