टेन्शनमध्ये वाढ! गेल्या 24 तासांत 1 हजार 553 कोरोनाचे नवे रुग्ण, 36 जणांचा मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । भारतात कोरोना वेगाने पसरत आहे. कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येने चिंता आणखी वाढली आहे. दरम्यान, आज पुन्हा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून कोरोनासंबंधी आकडेवारी जाहीर करण्यात आली. या आकडेवारीनुसार गेल्या 24 तासांत1 हजार 553 कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत, तर 36 जणांचा मृत्यू झाला आहे. तर देशात आतापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 17 हजार 265 वर पोहोचहली आहे.

देशातील 23 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील 59 जिल्हे कोरोनामुक्त झाले आहेत. गेल्या 28 दिवसांत पुदुचेरीमधील माहे आणि कर्नाटकातील कोडागु आणि उत्तराखंडमधील पौडी गढवाल जिल्ह्यात एकही कोरोना बाधित रुग्ण आढळला नाही. गोवा राज्य पूर्णपणे कोरोना मुक्त झाले आहे, असे आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी सांगितले.

केंद्रीय गृह मंत्रालय देशभरातील लॉकडाऊन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. लॉकडाऊनचे उल्लंघन झाल्यानंतर संबंधित राज्यांना त्यासंबंधी नियमांच्या सूचना मंत्रालयातील नियंत्रण कक्षातून देण्यात येत आहेत. आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या नियमांचे पालन करण्याचे राज्यांना आवाहन केले जात आहे, असे गृह मंत्रालयाच्या सह सचिव पुण्‍य सलिला श्रीवास्‍तव यांनी सांगितले.

WhatsApp करा आणि लिहा ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला“HelloNews”

 

Leave a Comment