दिलासादायक बाधित घटले : सातारा जिल्ह्यात नवे 751 पाॅझिटीव्ह तर दुप्पट कोरोनामुक्त

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके 

सातारा जिल्ह्यात गुरूवारी रात्री 12 वाजता आलेल्या रिपोर्टमध्ये केवळ 751 नवे कोरोना पाॅझिटीव्ह आले आहेत. तर काल दिवसभरात 1 हजार 453 जण कोरोनामुक्त होवून घरी सोडण्यात आल्याची माहीती जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

जिल्ह्यात उपचार्थ असलेल्या कोरोनाबाधितांची 11 हजार 525 झाली आहे. जिल्ह्यात आजपर्यंत एकूण कोरोनाबधितांची संख्या 1 लाख 78 हजार 983 इतकी झाली आहे. तर जिल्ह्यात एकूण 1 लाख 63 हजार 439 बरे झालेली रुग्णसंख्या आहे. तर कालपर्यंत 3 हजार 968 बाधितांचा मृत्यू झाला आहे. बुधवारी दिवसभरात 28 कोरोना बाधितांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.

बाधितांच्या मृत्यूमध्ये सातारा, कराड आघाडीवर

आजपर्यंत सातारा जिल्ह्यात झालेल्या 3 हजार 968 बाधितांचा मृत्यू झाला आहे. या आकडेवारीत सर्वात जास्त मृत्यू हे सातारा तालुक्यात 1 हजार 129 एवढे झाले आहेत. तर त्यानंतर जिल्ह्यात दुसऱ्या नंबरवर कराड तालुका आहे. कराड तालुक्यात आजपर्यंत 700 मृत्यू झालेले आहेत.

Leave a Comment