New Bajaj Pulsar NS125 : Bajaj ने अपडेटेड फीचर्ससह लाँच केली Pulsar NS125; तरुणांना लावणार वेड

New Bajaj Pulsar NS125
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

New Bajaj Pulsar NS125 : प्रसिद्ध ऑटोमोबाईल कंपनी Bajaj च्या गाड्या भारतात चांगल्याच प्रसिद्ध आहेत. ग्राहकांच्या गरज ओळखून बजाज कंपनी अपडेटेड फीचर्ससह नवनवीन मॉडेल लाँच करत असते. मागील काही महिन्यांपूर्वी कंपनीने आपली प्रसिद्ध बाईक Pulsar चे NS160 आणि NS200 मॉडेल नव्या अवतारात लाँच केले होते. आता बजाजने Pulsar NS125 ही बाईक अपडेटेड फीचर्ससह मार्केट मध्ये लाँच केली आहे. बाजारात बजाजची ही बाईक हीरो एक्सट्रीम 125R आणि TVS रेडर 125 सारख्या गाडयांना थेट टक्कर देईल. आज आपण Bajaj Pulsar NS125 चे खास फीचर्स आणि तिच्या किमतीबाबत जाणून घेऊयात.

गाडीच्या लूक आणि डिझाईनबाबत सांगायचं झाल्यास, Pulsar NS160 आणि NS200 प्रमाणेच New Bajaj Pulsar NS125 ला अपडेट्स मिळतात. कंपनीने या बाईकची मस्क्युलर डिझाईन अशीच कायम ठेवली फ्रंट डिझाईन, फ्युएल टँक आणि साइड पॅनेल्स सारखेच आहेत.मात्र, गाडीच्या हेडलाइट्समध्ये काही अंतर्गत बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार, या नव्या Pulsar NS125 थंडर-आकाराचे एलईडी डीआरएल देण्यात आले आहेत.

इंजिन– New Bajaj Pulsar NS125

गाडीच्या इंजिनबाबत सांगायचं झाल्यास, New Bajaj Pulsar NS125 मध्ये जुन्या मॉडेल प्रमाणेच 125cc सिंगल-सिलेंडर इंजिन देण्यात आलं आहे. हे इंजिन 5-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले असून 11.8bhp पॉवर आणि 11Nm टॉर्क जनरेट करते. गाडीला सस्पेन्शन सुद्धा चांगलं मिळत आहे, कारण त्यासाठी या बाइकमध्ये पुढच्या बाजूला टेलिस्कोपिक फ्रंट फोर्क्स आणि मागच्या बाजूला मोनोशॉक आहेत. याशिवाय ब्रेकिंगसाठी सिंगल-चॅनल एबीएस सिस्टमसह फ्रंट डिस्क आणि मागील ड्रम ब्रेक देण्यात आले आहेत.

अन्य फीचर्स-

अन्य फीचर्सबाबत बोलायचं झाल्यास, New Bajaj Pulsar NS125 मध्ये स्मार्टफोन कनेक्टिव्हिटीसह पूर्णपणे डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल आहे. यामाध्यमातून तुम्ही मोबाईलची बॅटरी लेव्हल, कॉल नोटिफिकेशन तसेच मेसेज चेक करू शकता. तसेच मोबाईल चार्जिंग साठी यूएसबी पोर्ट आणि सुरक्षिततेसाठी अँटी-लॉक ब्रेकिंग सिस्टीम बसवण्यात आली आहे. या नवीन 2024 Bajaj Pulsar NS125 ची किंमत 1,04,922 रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे. जुन्या मॉडेलच्या तुलनेत ही गाडी 5,000 रुपयांनी महाग झाली आहे. मात्र यामध्ये ग्राहकाना अपडेटेड फीचर्स सुद्धा मिळत आहेत.