हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । New Business Idea : आजकाल शेतकरी शेतीकडे व्यवसाय म्हणूनही पाहू लागले आहेत. जर आपण शेतकरी असाल आणि शेतीसोबतच एखादा जोडधंद्याच्या शोधात असाल तर आजची ही बातमी आपल्यासाठी खूपच उपयुक्त ठरेल. कारण आज आपण एनिमल्स फीड म्हणजेच चारा बनवण्याच्या व्यवसायाबाबतची माहिती जाणून घेणार आहोत. जर आपण शेतकरी नसाल तरीही आपल्याला हा व्यवसाय करता येईल. याद्वारे वर्षभर भरपूर कमाई होत राहील.
अशा प्रकारे सुरु करा व्यवसाय
चारा बनवण्याच्या व्यवसायासाठी तर सर्वात आधी आपल्याला गवत लागेल. यासोबतच मक्याचा पेंढा, गव्हाचा पेंढा, धान्य, मोहरीचा पेंढा, जनावरांना देण्यात येणारे सप्लिमेंट इ.लागतील मात्र, हा व्यवसाय सुरु करण्याआधी आपल्याला यासाठीचे लायसन्स घ्यावे लागेल. New Business Idea
अनेक प्रकारचे लायसन्स लागतील
दुध देणाऱ्या जनावरांसाठी पशुखाद्य व्यवसाय अत्यंत फायदेशीर ठरतो. हा व्यवसाय सुरु करण्यासाठी सर्वात आधी पशुखाद्य तयार करणाऱ्या फर्मचे नाव निवडावे लागेल. यानंतर त्याचे शॉपिंग एक्ट अंतर्गत त्याचे रजिस्ट्रेशन करावे लागेल. यानंतर, FSSAI कडून फूड लायसन्स आणि GST नंबर देखील घ्यावा लागेल. इतकेच नाही तर पर्यावरण विभागाकडून NOC देखील घ्यावी लागेल. याशिवाय पशुसंवर्धन विभागाकडूनही लायसन्स घ्यावे लागणार आहे. तसेच आपल्या ब्रँडचा ट्रेडमार्कही घ्यावा लागेल. यासोबतच ISI स्टँडर्डनुसार BIS सर्टिफिकेट देखील आवश्यक असेल. तसेच चारा बनवण्यासाठी काही मशिन्सही घ्याव्या लागतील. New Business Idea
सरकारकडून मिळेल कर्ज
हे लक्षात घ्या कि, हा व्यवसाय सुरू करण्यासाठी सरकारकडून कर्ज देखील घेता येते. स्वयंरोजगाराच्या अंतर्गत अनेक राज्य सरकारांकडून चारा व्यवसायासाठी कर्जही दिले जात आहे. याशिवाय प्रधानमंत्री मुद्रा योजनेअंतर्गत 10 लाख रुपयांचे कर्ज देखील मिळू शकेल. New Business Idea
कोणत्या मशीन्सची लागतील ???
चारा तयार करण्यासाठी फीड ग्राइंडर मशीन आणि कॅटल फीड मशीनची आवश्यकता भासेल. याशिवाय चारा मिसळण्यासाठी मिक्सर मशीन आणि सर्व गोष्टींचे वजन करण्यासाठी वजन काटा घ्यावा लागेल.
किती नफा मिळेल ???
ग्रामीण भागात बहुतांश शेतकऱ्यांकडून पशुपालन केले जाते. अशा शेतकऱ्यांसाठी हा व्यवसाय खूपच फायदेशीर ठरेल. याद्वारे त्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळू शकेल. या व्यवसायासाठी काही मशीन्स आणि जागा लागेल. यातील मशीन्सनवर 1 लाख रुपयांपेक्षा जास्त खर्च होणार नाही. तसेच, जर आपली स्वतःची जागा असेल तर चांगले. जर नसेल जागा भाड्यानेही घेता येईल. यानंतर ऑर्डर मिळताच चारा तयार करून विकता येईल. या व्यवसायातून 20-30% नफा सहजपणे मिळवता येतो. तसेच जर चांगली मागणी असेल तर नफा 40 टक्क्यांपर्यंत वाढू देखील शकतो. New Business Idea
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या : https://www.mudra.org.in/
हे पण वाचा :
FD Rates : बँकेमध्ये FD करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, आता काही महिन्यातच पैसे होणार दुप्पट
Bank of Baroda च्या ग्राहकांनी लवकरात लवकर करा ‘हे’ काम, अन्यथा बंद होऊ शकेल खाते
Bank FD : ‘या’ 5 सरकारी बँका ज्येष्ठ नागरिकांना FD वर देत आहेत भरपूर व्याज, जाणून घ्या व्याजदर
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमती महागल्या, पहा आजचे नवीन भाव
BSNL च्या 87 रुपयांच्या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगसोबत मिळवा डेली 1GB डेटा