मुंबई । ब्रिटनमध्ये हाहाकार माजवलेल्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचा आता महाराष्ट्रातही शिरकाव झाला आहे. ब्रिटनमधून राज्यात परतलेल्या ८ जणांमध्ये करोनाच्या नव्या स्ट्रेनची लक्षणं आढळली आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. त्यामुळे महाराष्ट्राची चिंता पुन्हा वाढली आहे. काही दिवसांपूर्वी ब्रिटनमधून भारतात परतलेल्या रुग्णांमध्ये करोनाचा नवा स्ट्रेन आढळला होता. मात्र, आता राज्यात करोनाच्या नव्या स्ट्रेनचे रुग्ण आढळल्यानं चिंता अधिक वाढली आहे.
याशिवाय राज्यातील आरोग्य प्रशासनदेखील अधिक सावध झालं असून या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या रुग्णांचा शोध घेण्याचा प्रयत्न आरोग्य प्रशासन करत आहे.ब्रिटनमधून महाराष्ट्रात परतलेल्या ८ प्रवाश्यांपैकी ५ प्रवासी मुंबईतील आहेत. तर, पुणे, ठाणे आणि मीरा- भाईंदरमधील प्रत्येकी एक रुग्णांचा समावेश आहे. या सर्व रुग्णांना विलगीकरण कक्षात ठेवलं आहे, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.
ब्रिटनमधून परतलेल्या महाराष्ट्रातील 8 प्रवाशांमध्ये नवीन कोरोनाची लक्षणे आढळून आली असून त्यातील मुंबईतील 5, पुणे, ठाणे आणि मीरा भाईंदर मधील प्रत्येकी एक जणांचा समावेश आहे. हे सर्व जण विलगीकरणात असून त्यांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरू आहे.#CoronaVirusUpdates
— Rajesh Tope (@rajeshtope11) January 4, 2021
दरम्यान, कोरोना लसीच्या वितरणासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आढावा बैठक घेतली असून राज्यात करोनाच्या नवीन स्ट्रेनची लागण झालेल्या रुग्णांबाबतही चर्चा केली. त्याबाबत आरोग्य विभाग व मनपा आयुक्त यांच्याशी चर्चा केली व अधिक दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’