कोरोनानंतर देशात आता ‘बर्ड फ्लू’चं संकट! ‘या’ राज्यात अंडी आणि चिकन विक्रीवर बंदी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । कोरोना विषाणूच्या संसर्गाचं संकट पूर्णपणे टळत नाही, तोच देशावर आणखी एका साथीचं संकट आलं आहे. कोरोनानंतर हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, पंजाब, केरळमध्ये ‘बर्ड फ्लू’चं नवं संकट ओढावलं आहे. या राज्यात अंडी आणि चिकन विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. महाराष्ट्रात मात्र अद्याप ‘बर्ड फ्लू’चं संकट नाही आहे. याशिवाय बिहार, उत्तराखंड आणि झारखंडमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे.

काही अधिकाऱ्यांनी हिमालच प्रदेशात असणाऱ्या कांडगा जिल्ह्यातील पोंग बांध तलावात मृतावस्थेत आढळलेल्या काही स्थलांतरित पक्ष्यांमध्ये बर्ड फ्लूचे विषाणू आढळल्यामुलं हे संकट आता आणखी गडद होताना दिसत आहे. तिथं राजस्थानातील अनेक जिल्ह्यांतूनही पक्ष्यांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये सोमवारी 170हून अधिक पक्षी मृतावस्थेत आढळल्याची माहिती समोर येत आहे.

पशुपालन विभागाच्या माहितीनुसार 425हून जास्त कावळे, बगळे आणि काही पक्ष्यांचा मृत्यू झाला आहे. झालावाडमधील पक्ष्यांचे काही नमुने परीक्षणासाठी भोपाळमध्ये असणाऱ्या राष्ट्रीय सुरक्षा पशुरोग संशोधन संस्थेकडे पाठवण्यात आले होते. ज्यामध्ये बर्ड फ्लूच्या संसर्गाची धक्कादायक माहिती समोर आली. दरम्यान, इतर जिल्ह्यातील नमुन्यांचा अहवाल अद्याप हाती आलेला नाही.

H5N8 विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी 40 हजार पक्षी मारणार
केरळमधील अलपुझ्झा आणि कोट्टायम येथे या विषाणूच्या प्रसाराची माहिती मिळाल्यामुळं आता प्रभावित क्षेत्रात असणाऱ्या बदक, कोंबड्या आणि अन्य पाळी पक्षांना मारण्याचे आदेश प्रशासनानं दिले आहेत. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार H5N8 विषाणूच्या प्रसारासाठी जवळपास 40 हजार पक्ष्यांना मारावं लागणार आहे.

हिमाचलमध्ये अंडी, मांस, चिकन विक्रीवर बंदी
कांगडा येथी जिल्हाधिकारी राकेश प्रजापती यांनी फतेहपूर, देहरा, जवाली, इंदैरा या भागांत कोंबडी, बदक, मासे या प्रजातींपासून मिळणारी उत्पादनं, अंडी, मांस या साऱ्याच्या विक्रीवर बंदी घातली आहे. बर्ड फ्लूचा हा धोका आणि मानवामध्येही याच्या संसर्गाचा धोका असल्यामुळं आता मध्य प्रदेश, केरळ, या राज्यांत सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, महाराष्ट्रात मात्र अद्यापही अशा संसर्गाचं निरिक्षण नसल्यामुळं तुर्तास बर्ड फ्लूचा धोका नसल्याचं स्पष्ट होत आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment