राज्यातील सरकारी शाळांमध्ये मोठा बदल; अभ्यासक्रमाचा नवा फॉर्म्युला लागू होणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्रातील सरकारी शाळांमध्ये सीबीएसई (CBSE ) पॅटर्न लागू करण्यास सुकाणू समितीकडून मान्यता मिळालेली आहे. त्यामुळे आता आगामी 2025-26 शैक्षणिक वर्षापासून सीबीएसई अभ्यासक्रम लागू करण्याच्या तयारीस सुरुवात झाली आहे. शालेय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांनी विधान परीषदेत यासंदर्भात माहिती दिली असून, भाजप आमदार प्रसाद लाड यांनी या मुद्द्यावर प्रश्न उपस्थित केला होता, त्यावर मंत्री भूसे यांनी लेखी उत्तर दिले आहे. त्यामुळे आता शिक्षणाची नवी पद्धत कशी असेल अन त्यासाठी काय तयारी करावी लागेल , हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

अभ्यासक्रमाची रचना –

राज्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी आगामी अभ्यासक्रमामध्ये 70-30% चा फॉर्म्युला राबवला जाणार आहे. यामध्ये 70% अभ्यासक्रम सीबीएसई पॅटर्नचा असेल, तर 30% राज्य शिक्षण मंडळाचा अभ्यासक्रम असेल. यामध्ये भाषाविषयक अन इतिहास विषयावर कोणतीही तडजोड केली जाणार नाही, अशी माहिती शिक्षक आमदार म्हात्रे यांनी दिली आहे . त्याचसोबत इतिहास विषयात 30% भाग छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, ताराराणी अन मराठा साम्राज्याच्या इतिहासावर असणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना राज्याचा ऐतिहासिक वारसा देखील शिकता येईल.

यंदा सीबीएसई अभ्यासक्रम पहिली इयत्ता पासून लागू –

यंदा सीबीएसई अभ्यासक्रम पहिली इयत्ता पासून लागू होईल अन नंतर प्रत्येक इयत्तेसाठी अभ्यासक्रम बदलला जाईल. राज्य शिक्षण मंडळाला नव्या पाठ्यपुस्तकांची छपाई करण्याची जबाबदारी दिली जाईल. शाळा 1 जूनला सुरू झाल्यावर शिक्षकांना नवीन अभ्यासक्रमासाठी त्वरित प्रशिक्षण दिले जाईल. दरम्यान, शालेय वर्षाच्या वेळापत्रकावर देखील गोंधळाची स्थिती आहे. मार्च महिन्यात शिक्षण विभागाने अचानक पहिली ते नववी इयत्तेपर्यंतच्या वार्षिक परीक्षा एप्रिलच्या अखेरीस घेण्याची सूचना दिली. यामुळे शैक्षणिक वर्तुळात गोंधळ उडाल्याचे दिसून आले आहे. शिक्षक व पालकांनी वार्षिक परीक्षा पूर्वीच्या वेळापत्रकानुसार घेण्याची मागणी केली आहे.

नव्या पद्धतीसाठी शिक्षक आणि विद्यार्थ्यांना नवीन आव्हाने –

या बदलामुळे राज्यातील शाळांमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल होणार असून, शिक्षणाच्या नव्या पद्धतीसाठी शिक्षक आणि विद्यार्थ्यांना नवीन आव्हाने समोर येणार आहेत.