सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सातारा जिल्ह्यात शिंदे गटाने उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेशी फारकत घेतल्यानंतर आता पदाधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या करण्यावर भर दिला आहे. सातारा जिल्ह्यात शिंदे गटाने आपली नवे पदाधिकारी जाहीर केले आहेत. उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत पदाधिकाऱ्यावर जबाबदाऱ्या सोपविल्या.
सातारा जिल्हा नवे पदाधिकारी व पदे पुढीलप्रमाणे ः- जिल्हा संपर्कप्रमुख शरद कणसे, सातारा जिल्हा सहसंपर्क प्रमुख एकनाथ ओंबळे, सातारा जिल्हा संघटक चंद्रकांत जाधव, सातारा जिल्हा प्रमुख पुरूषोत्तम जाधव, सातारा जिल्हाप्रमुख जयवंत शेलार, सातारा शहर प्रमुख निलेश मोरे, उपजिल्हाप्रमुख सातारा विधानसभा संदीप पवार, उपजिल्हाप्रमुख कराड दक्षिण अक्षय मोहिते, उपजिल्हाप्रमुख कोरेगाव विधानसभा निलेश पवार, सातारा तालुकाप्रमुख शामराव लोटेकर, उपजिल्हाप्रमुख वाई विधानसभा प्रदीप माने, जावली तालुकाप्रमुख शांताराम कदम, महाबळेश्वर शहर प्रमुख विजय नायडू, लोणंद शहर प्रमुख उमेश बेंद्रे, शिरवळ शहर प्रमुख ज्ञानेश्वर भांडे, खटाव तालुका प्रमुख ज्ञानेश्वर काटकर, महाबळेश्वर तालुकाप्रमुख विजय भिलारे, वाई तालुका प्रमुख अक्षय चव्हाण, कोरेगाव तालुका प्रमुख संजय काटकर यांच्या नियुक्त्या केलेल्या आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने अद्याप शिवसेना आपलीच केलेला दावा सोडलेला नाही. त्यामुळे शिवसेनेच्या शिंदे गटाची नवी कार्यकारणी जाहीर झाली. तर दुसरीकडे उध्दव ठाकरे गटाचेही पदाधिकारी शिवसेना म्हणून काम करत आहेत. त्यामुळे आता सातारा जिल्ह्यात दोन्ही गटात कोण भारी ठरणार हे आगामी काळात कळेल.