हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन New Flight Luggage Rules। तुम्ही जर विमानातून प्रवास करत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. विमान प्रवासादरम्यान, फ्लाइटमध्ये लगेज, बॅग सारख्या सामानांना घेऊन जाण्याबाबत नवे नियम लागू करण्यात आले आहेत. या नियमांतर्गत काही वस्तुंना प्रवास करत असताना बंदी घालण्यात आली आहे. भारतीय नागरी उड्डाण मंत्रालयाने ट्विटर करून याबाबत माहिती दिली आहे. त्यामुळे नेमक्या कोणकोणत्या वस्तू बॅन केल्यात ते जाणून घेणं आवश्यक आहे, अन्यथा तुमच्यावर कारवाई होऊ शकते.
कोणकोणत्या वस्तुंना बंदी? New Flight Luggage Rules
याबाबत नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने ट्विट करत म्हंटल कि, सर्व प्रवाशांना कळवण्यात येत आहे कि, सुरक्षा नियमांमुळे केबिन बॅगेजमध्ये काही घरगुती वस्तू ठेवण्यास मनाई आहे. हे निर्बंध एका व्यापक वर्गीकरण सिस्टीम अंतर्गत येतात आणि ते आठ श्रेणींमध्ये विभागले आहेत. शस्त्रे आणि प्रतिकृती, स्फोटके, धोकादायक पदार्थ, धोकादायक वस्तू, साधने, इलेक्ट्रॉनिक वस्तू, घरगुती वस्तू आणि क्रीडा वस्तू….. प्रवाशांना तपशीलवार सामान मार्गदर्शक तत्त्वांचे काळजीपूर्वक पालन करण्याचा सल्ला नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने कडून देण्यात आला आहे. ज्या वस्तूंना बंदी घालण्यात आली आहे, त्या विमानातून नेऊ नये, असंही या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
The Ministry of Civil Aviation informs all passengers that certain household items are prohibited in cabin baggage due to security regulations.
— MoCA_GoI (@MoCA_GoI) May 27, 2025
These restrictions fall under a comprehensive classification system that divides items into eight categories: Weapons and Replicas,… pic.twitter.com/eLcXaWBsZJ
नागरी उड्डाण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, फ्लाइटमध्ये केबिन बॅगेजमध्ये कात्री, सिगार कटर, नाईट स्टिक, दोरी, सेलो किंवा मापन टेप, सुका नारळ, ब्लेड, छत्री, आगपेटी, बर्फ फोडण्याचे हत्यार यासारख्या गोष्टी (New Flight Luggage Rules) तुम्ही घेऊन जाऊ शकत नाही. . सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या गोष्टी खूप धोकादायक मानल्या जातात.विमानात प्रवास करताना, सामानाचे वजन आणि आकार देखील तपासा. विमानात द्रव वाहून नेण्याची मर्यादा देखील आहे. प्रवासी त्याच्यासोबत फक्त एक लिटर लिक्विड वाहून नेऊ शकतात.




