नवीन सरकार लवकरच तयार होईल – देवेंद्र फडणवीस 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्लीमहाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांच्या आज नवी दिल्ली येथे राज्यातील अवकाळी पाऊस व सत्ता स्थापने बाबत जवळ पास ४० मिनिटे चर्चा झाली . या भेटीबाबत फडणवीस यांना विचारले असता ते म्हणाले, ”नवीन सरकार स्थापनेवर कुणी काय बोललं आहे यावर मला भाष्य करण्याची इच्छा नाही. मला एवढेच सांगायचे आहे की नवीन सरकार लवकरच तयार होईल.”

सत्तेबाबत अनेक लोक नेहमी प्रसामाध्यमांसमोर बोलत आहे मात्र मला याबाबात सध्या काहीही भाष्य करायचे नाही आहे. सध्या एवढेच सांगायचे आहे की आमचे नवीन सरकार लवकरच तयार होईल असा आम्हला विश्वास आहे.

 

Leave a Comment