राज्यात पुन्हा कठोर निर्बंध; लग्नसमारंभास फक्त 50 तर अंत्यविधीसाठी 20 लोकांनाच परवानगी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना विषाणूने पुन्हा एकदा कहर केला असून ओमायक्रोनच्या रुग्णसंख्येत देखील लक्षणीय वाढ झाली असून राज्याच्या चिंतेत भर पडली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यातील निर्बंध अधिक कडक करत नवी नियमावली जाहीर केली आहे. गुरुवारी टास्कफोर्ससोबत झालेल्या बैठकीनंतर राज्यात निर्बंध लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

काय आहे नवी नियमावली-

सांस्कृतिक, धार्मिक, राजकीय कार्यक्रम आणि लग्नसोहळे फक्त 50 लोकांच्या उपस्थितीत करता येणार आहेत.

अंत्यसंस्कारासाठी 20 लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे.

पर्यटन स्थळे, समुद्र किनारे, रिकामी मैदाने आदी ठिकाणी कलम 144 लागू

परिस्थिती पाहून स्थानिक प्रशासनाला कडक निर्बंध लावण्याची मुभा

राज्यात काल गुरुवारी तब्बल  5 हजार 368 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 1193  रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात काल 22 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.  राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 18 हजार 217 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

Leave a Comment