मुंबईत काय सुरु आणि काय बंद ; महापालिकेने जारी केली नवी नियमावली

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात कोरोना प्रादुर्भाव काही प्रमाणात कमी आल्यानंतर राज्य सरकार कडून लॉकडाऊनच्या निर्बंधात काही प्रमाणात शिथिलता आणली आहे. दरम्यान मुंबईला तिसऱ्या टप्प्यात सामील करण्यात आलं असून मुंबई महानगरपालिकेनं आपली स्वतंत्र नियमावली जारी केली आहे.

मुंबईत काय सुरू आणि काय बंद –

अत्यावश्यक दुकानं आणि आस्थापना दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू राहतील.

औषधांच्या दुकांनाना २४ तास सुरू ठेवण्याची परवानगी.

अन्य दुकारे आणि आस्थापना सोमवार ते शुक्रवार या कालावधीत दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू राहतील.

मॉल, चित्रपटगृहे, नाट्यगृहे राहणार बंद.

उपहारगृहांना सोमवार ते शुक्रवारी दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी. त्यानंतर केवळ टेक अवे सुविधा.

लोकल सेवा वैद्यतीय आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीच सुरू राहणार.

स्थानिक, सहकारी संस्थांच्या सभा निवडणुकांना ५०  टक्के क्षमतेसह परवानगी.

लग्नसोहळ्यास ५० जणांना तर अंत्यसंस्काराला २० जणांना उपस्थित राहण्याची परवानगी.

संध्याकाळी ५ वाजेपर्यंतच बाहेर चित्रिकरण करण्यास परवानगी. त्यानंतर बाहेर जाण्यास परवागी नाही.

सामाजित आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना सोमवार ते शुक्रवार दुपारी ४ वाजेपर्यंत ५० टक्क्यांपर्यंत परवानगी.

बांधकामाच्या ठिकाणी राहणाऱ्या कामगारांना परवानगी.

बेस्ट सेवा १०० टक्के क्षमतेसह सुरू ठेवण्यास परवानगी. उभं राहून प्रवास करता येणार नाही.

आंतरजिल्हा वाहतुकीला (खासगी, कार, टॅक्सी,बस) पाचव्या टप्प्यातील जिल्ह्यातून वाहन जाणार नसल्यास प्रवास करण्याची परवानगी.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

Leave a Comment