हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । New Hero Splendor+ Launch : भारतातील दुचाकीतील अग्रगण्य कंपनीपैकी Hero एक आहे. Hero ने ग्राहकांसाठी परवडणाऱ्या दरात एकापेक्षा एक चांगल्या दुचाकी लाँच केल्या आहेत. Hero Splendor+ ही Hero ची देशातील सर्वाधिक विकली जाणारी दुचाकी ठरली आहे. आता कंपनीने यामध्ये बदल करताना तिला पुन्हा एकदा पूर्णपणे नवीन रूपात लॉन्च केले आहे. यासोबतच ग्राहकांना आता 4 नवीन रंग आणि अनेक नवीन फीचर्स देखील मिळणार आहेत. त्याचबरोबर त्याची किंमतही अगदी वाजवी ठेवण्यात आली आहे.
Hero Splendor खूपच लोकप्रिय आहे. जिला ‘जनता की मोटरसायकल’ म्हणूनही ओळखले जाते. त्याची निर्माता असलेल्या Hero MotoCorp ने नुकतेच त्याची नवीन आवृत्ती Hero Splendor + XTEC लाँच केली आहे. या नवीन Hero Splendor + XTEC मध्ये 97.2cc BS-6 हे इंजिन असेल. जे 7.9 bhp ची मॅक्स पॉवर आणि 8.5Nm चा पीक टॉर्क जनरेट करेल. यामध्ये देण्यात आलेल्या i3S पेटंट तंत्रज्ञानामुळे ही मोटरसायकल चांगला मायलेज देईल असे कंपनीने म्हंटले आहे. New Hero Splendor+ Launch
या नवीन Hero Splendor+ XTEC यासोबतच ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, डिजिटल मीटर, रिअल टाइम मायलेज इंडिकेटर, कॉल आणि एसएमएस अलर्ट, फ्युएल इंडिकेटर, एलईडी हेडलॅम्प, यूएसबी चार्जर, साइड स्टँड इंजिन कट ऑफ आणि नवीन स्टॉप-स्टार्ट सिस्टीम सारखे फीचर्स देखील मिळतील. तसेच जर तोल गेल्याने ही दुचाकी घसरली तर त्याचे इंजिन आपोआप बंद होईल. New Hero Splendor+ Launch
ही दुचाकी स्पार्कलिंग बीटा ब्लू, कॅनव्हास ब्लॅक, टोर्नाडो ग्रे आणि पर्ल व्हाइट या चार नवीन कलरमध्ये लॉन्च करण्यात आली आहे. तसेच या Hero Splendor+ XTEC ची एक्स-शोरूम किंमत 72,900 रुपये असेल. यासोबत कंपनीकडून 5 वर्षांची वॉरंटी देखील दिली जात आहे. New Hero Splendor+ Launch
Hero MotoCorp च्या अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://m.heromotocorp.com/two-wheelers.html
हे पण वाचा :
Fact Check : भारत सरकार देतंय 20 लाख रुपये? Viral मेसेज मागील सत्य जाणून घ्या
Stock Market Update : येत्या आठवड्यात सेन्सेक्स-निफ्टीमध्ये वाढ होणार की घसरण ???
Airtel Price Hike : Airtel च्या ग्राहकांना पुन्हा बसणार धक्का, प्रीपेड प्लॅन्स आणखी महागणार
Dental Health Insurance: दातांच्या उपचारांसाठी PNB MetLife ने लाँच केला डेंटल हेल्थ इन्शुरन्स प्लॅन
farmer: म्हणून तरुण शेतकऱ्याने कांदा सरळ जनावरांपुढे टाकून दिला..