हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (New Marathi Film) मराठी कलाविश्वात अत्यंत लाडके कलाकार अभिनेता अंकुश चौधरी, स्वप्नील जोशी आणि अभिनेत्री सई ताम्हणकर यांचा स्वतःचा वेगवेगळा चाहता वर्ग आहे. जो त्यांच्या आगामी प्रोजेक्टबाबत कायम उत्सुक असतो. अशातच या तिन्ही कलाकारांच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. हे तिघे तोडीचे कलाकार एकत्र प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी आता सज्ज झाले आहेत. लवकरच एका नव्या सिनेमातून हे जबरदस्त त्रिकुट आपल्या भेटीसाठी येत आहे.
मुहूर्त संपन्न (New Marathi Film)
ए.वी.के पिक्चरस्, व्हिडीओ पॅलेस आणि मैटाडोर प्रोडक्शन प्रस्तुत एक नवीन मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे नाव आणि अन्य बाबी अद्याप गुलदस्त्यात आहेत. असे असले तरीही एक गोष्ट निश्चित झाली आहे की, या चित्रपटात अभिनेता अंकुश चौधरी, स्वप्नील जोशी आणि सई ताम्हणकर मुख्य भूमिकेत झळकणार आहेत.
इतकेच नव्हे तर या चित्रपटाचे दिग्दर्शन संजय जाधव करणार असल्याचेही समोर आले आहे. या चौघांना एकत्र पाहून नक्कीच प्रेक्षकांच्या मनात टिक टिक वाजली असेल आणि धडधड सुरु झाली असेल. नुकताच त्यांच्या आगामी चित्रपटाचा मुहूर्त संपन्न झाला असून त्याचे काही फोटो समोर आले आहेत.
११ वर्षानंतर पुन्हा एकत्र
या आगामी चित्रपटाची पूर्वतयारी आता सुरु झाली असून ही जबरदस्त टीम तब्बल ११ वर्षांनंतर प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या नव्या चित्रपटाचे दिग्दर्शक संजय जाधव करणार असल्यामुळे हा चित्रपट काहीतरी हटके कथानक घेऊन येतोय इतके लक्षात असते. (New Marathi Film) माहितीनुसर, या आगामी चित्रपटाचे निर्माते स्वाती खोपकर, अमेय खोपकर, नानूभाई जयसिंघानी आणि निनाद बत्तीन आहेत. नुकताच या चित्रपटाचा मुहूर्त संपन्न झाला आणि यावेळी निर्मात्यांसह, चित्रपटातील कलाकार आणि तंत्रज्ञ मंडळी उपस्थित होती.
मोठा गेम तर नक्कीच होणार..
या चित्रपटाबाबत बोलताना अमेय खोपकर म्हणाले की, ‘संजय जाधव यांच्यासंख्या धमाकेदार दिग्दर्शकासोबत ‘येरे येरे पैसा’, ‘येरे येरे पैसा 3’, ‘कलावती’ हे यशस्वी चित्रपट केल्यानंतर आता हा नवाकोरा चित्रपट करायला मिळतो आहे. अंकुश, सई, स्वप्नील यांसारखे कमाल कलाकार या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारणार आहेत. (New Marathi Film) या टीमसोबत माझे जुने ऋणानुबंध आहेत आणि ही टीम एकत्र आणण्याचा योग निनाद बत्तीन यांनी जुळवून आणला असून ही टीम पुन्हा एकत्र आल्यावर मोठा गेम तर नक्कीच होणार आणि चित्रपट गाजणारच!’