हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (New Marathi Movie) आपल्या महाराष्ट्राची ओळख त्याला लाभलेली नैसर्गिक साधनसंपत्ती, ऐतिहासिक वारसा, विविध प्रेक्षणीय स्थळे अशा वेगवेगळ्या गोष्टींमुळे आहे. त्यात महत्त्वाच्या दोन गोष्टी म्हणजे कुस्ती आणि बैलगाडा शर्यत. अख्ख्या महाराष्ट्रात कुस्ती आणि बैलगाडा शर्यतप्रेमींची संख्या फार मोठी आहे. यातच आता महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या या दोन गोष्टींवर आधारित एक थरारक अनुभव देणारा नवा चित्रपट येत आहे. ज्याचे नाव ‘रांगडा’ असे असून या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच प्रदर्शित करण्यात आले आहे.
‘रांगडा’ चित्रपटाचे पोस्टर रिलीज (New Marathi Movie)
‘रांगडा’ या आगामी चित्रपटाचे पोस्टर नुकतेच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले आहे. शेतकरी पुत्र प्रॉडक्शन या निर्मिती संस्थेच्या माध्यमातून योगेश बालवडकर, किरण फाटे, राहुल गव्हाणे, मच्छिन्द्र लंके, अब्बास मुजावर, आयुब हवालदार यांनी ‘रांगडा’ या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
चित्रपटाच्या निर्मितीसह कथा आणि दिग्दर्शन अशी कामगिरी आयुब हवालदार यांनी केली असून बाबाजी सातपुते आणि युवराज पठारे यांनी सहनिर्मिती केली आहे. संवादलेखक म्हणून दीपक ठुबे यांनी काम पाहिले आहे. (New Marathi Movie)अजित मांदळे, नौशाद इनामदार यांनी संकलन तर अन्सार खान यांनी छायाचित्रण केले आहे. अरुण वाळूंज, प्रमोद अंबाडकर यांनी लिहिलेल्या गीतांना रोहित नागभिडे यांचे सुमधुर संगीत लाभले आहे.
नव्या दमाचे कलाकार
‘रांगडा’ या आगामी मराठी चित्रपटातून नवोदित कलाकारांची मोठी स्टारकास्ट पहायला मिळणार आहे. (New Marathi Movie) भूषण शिवतारे, मयुरी नव्हाते, अमोल लंके, भीमराज धनापुणे, अतिक मुजावर, संदीप (बापु) रासकर, राजेंद्र गुंजाळ, पल्लवी चव्हाण, निकिता पेठकर, निलेश कवाद हे कलाकार या चित्रपटात दमदार भूमिका साकारताना दिसणार आहेत.
कधी रिलीज होणार?
मराठीत आजवर काही चित्रपटांतून बैलगाडा शर्यत आणि कुस्तीचं दर्शन झालं आहे. पण याच दोन खेळांवर बेतलेली कथा रांगडा या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. चित्रपटात सर्वसामान्य कुटुंबातील तरुणाला कुस्ती आणि बैलगाडा शर्यतीचा असलेला छंद, त्यासाठी त्याला करावा लागणारा संघर्ष हे कथासूत्र आहे. (New Marathi Movie) त्यामुळे महाराष्ट्राच्या कृषि आणि क्रीडा संस्कृतीचे दोन मानबिंदू असलेल्या बैलगाडा शर्यत आणि कुस्तीचा थरार मोठ्या पडद्यावर पाहणं ही प्रेक्षकांसाठी निश्चितच पर्वणी ठरणार आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे या चित्रपटातील दोन्ही मुख्य कलाकार कुस्ती क्षेत्रातील राष्ट्रीय खेळाडू आहेत. या चित्रपटाला प्रेक्षक नक्कीच डोक्यावर घेतील यात शंका नाही. त्यासाठी आता केवळ ५ जुलै २०२४ पर्यंतच प्रतीक्षा करावी लागणार आहे.