पुणेकरांसाठी खुशखबर !! बालाजीनगर येथे नवीन मेट्रो स्थानकाला मंजुरी

0
27
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पुण्यात बरीच वर्दळ असून ,यामुळे लोकांना वाहतूक कोंडीच्या समस्यला सामोरे जावे लागते. हि समस्या सोडवण्यासाठी स्वारगेट ते कात्रज या प्रस्तावित मेट्रो मार्गासंबंधात एक बातमी समोर आली आहे. या महत्वाच्या मार्गावर आता बालाजीनगर येथे भारती विद्यापीठाच्या प्रवेशद्वाराजवळ एक नवीन स्थानक तयार होणार आल्याचे सांगण्यात आले आहे. या विस्तारित मेट्रो मार्गाची लांबी 5.65 किलोमीटर असून, सुरुवातीला मार्केट यार्ड, पद्मावती आणि कात्रज अशी तीन स्थानके प्रस्तावित होती. पण लोकप्रतिनिधी व स्थानिकांच्या मागणीनुसार बालाजीनगर येथे हे चौथे स्थानक समाविष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे आता प्रवाशांच्या वाहतूक कोंडीच्या समस्या दूर होणार आहेत.

विविध स्थानकांमधील निश्चित अंतर जाहीर –

महा मेट्रोने पुणे शहरातील विविध स्थानकांमधील निश्चित अंतर जाहीर केले आहे. स्वारगेट स्थानकापासून मार्केट यार्ड पर्यंतचे अंतर 1.31 किलोमीटर आहे. त्यानंतर मार्केट यार्ड ते पद्मावती स्थानकातील अंतर 2.11 किलोमीटर आहे. पद्मावती ते बालाजीनगर स्थानकाच्या दरम्यानचे अंतर 1.23 किलोमीटर आहे. आणि शेवटी बालाजीनगर ते कात्रज स्थानकापर्यंतचे अंतर 1 किलोमीटर आहे. या मेट्रो मार्गाने शहरातील प्रवास अधिक सोयीस्कर आणि वेगवान होणार आहे.

मेट्रो मार्गासाठी किती खर्च –

या विस्तारित मेट्रो मार्गासाठी अंदाजे 2954 कोटी रुपयांचा खर्च होणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. पण नव्याने स्थापित बालाजीनगर स्थानकाचा खर्च यामध्ये समाविष्ट करण्यात आलेला नाही. या स्थानकाच्या खर्चाचा प्रस्ताव लवकरच राज्य सरकारकडे सादर केला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

प्रवास अधिक वेगवान होणार –

स्वारगेट-कात्रज हा मेट्रो मार्ग पूर्णपणे भूमिगत असणार आहे. सध्या भूवैज्ञानिक सर्वेक्षण सुरू असून, प्रकल्प पूर्ण झाल्यावर वाहतूक कोंडी कमी होईल आणि प्रवास अधिक वेगवान होणार आहे . स्थानिक नागरिकांनी या मेट्रो प्रकल्पाचे स्वागत केले असून, त्याचा परिसरातील प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. तसेच महामेट्रोचे कार्यकारी संचालक हेमंत सोनवणे यांनी सांगितले की, स्थानकांमधील अंतरानुसार दर निश्चित केले जातील. या मार्गामुळे स्वारगेट ते कात्रज दरम्यानचा प्रवास अधिक सोयीचा होणार आहे.