New Movie : सिनेमागृहात होणार विठूनामाचा गजर; ‘डंका… हरी नामाचा’ चित्रपट येतोय प्रेक्षकांच्या भेटीला

New Movie
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (New Movie) विविध कथानक, विविध आशय आणि विषय असणाऱ्या अनेक मराठी कलाकृती आजवर प्रेक्षकांच्या भेटीस आल्या आहेत. यातील प्रत्येक जॉनरचा एक वेगळा प्रेक्षक वर्ग असल्याचे समजते. राजकीय, सामाजिक, रोमँटिक, हॉरर, बायोपिक अशा विविध जॉनरच्या कलाकृतींमुळे प्रेक्षकही सुखावतात. त्यामुळे कायम काहीतरी वेगळं पाहायला मिळेल अशी त्यांची इच्छा आहे. दरम्यान, लवकरच एका वेगळ्या विषयावर भाष्य करत संपूर्ण वातावरण भक्तिमय करायला ‘डंका.. हरी नामाचा’ हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.

सिनेमागृहात वाजणार ‘डंका.. हरी नामाचा’ (New Movie)

‘डंका… हरी नामाचा’ या चित्रपटाची घोषणा करून बरेच दिवस होऊन गेले आहेत. मात्र अजूनही या चित्रपटाबाबत काहीही अपडेट नसल्यामुळे कुठेतरी प्रेक्षक नाराज होते. अशातच आता या चित्रपटाची रिलीज डेट समोर आली आहे. येत्या १९ जुलै २०२४ रोजी हा चित्रपट सर्वत्र महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. गणराज स्टुडिओज् आणि रुद्र एंटरटेनमेंट्स प्रस्तुत ‘डंका… हरी नामाचा’ हा चित्रपट श्रेयश जाधव, रवी फड निर्मित आहे. तर श्रेयश जाधव चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

५ भाषेत होणार प्रदर्शित

गणराज स्टुडिओज् आणि रुद्र एंटरटेनमेंट्स प्रस्तुत ‘डंका… हरी नामाचा’ हा चित्रपट एक दोन नव्हे तर तब्बल ५ विविध भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. यामध्ये मराठी भाषेसह हिंदी, तेलगु, तामिळ आणि कन्नड भाषेचा देखील समावेश आहे. (New Movie)

माहितीनुसार, या चित्रपटात तगडी स्टारकास्ट पहायला मिळणार आहे. यामध्ये अभिनेता अनिकेत विश्वासराव, प्रियदर्शन जाधव, किरण गायकवाड, सयाजी शिंदे, रसिका सुनील, अक्षया गुरव, कबीर दुहान सिंग, निखिल चव्हाण, अविनाश नारकर, महेश जाधव, मयूर पवार आणि किरण भालेराव या कलाकारांचा समावेश आहे.

मराठी चित्रपटांना वेगळ्या उंचीवर नेण्याचा प्रयत्न

या चित्रपटाबद्दल बोलताना दिग्दर्शक श्रेयश जाधव म्हणाले की, ”डंका… हरी नामाचा’ हा भव्य चित्रपट एक अॅक्शनपट असून त्याला विनोदाची जोड लाभली आहे. हळूहळू या चित्रपटाविषयीच्या अनेक गोष्टी प्रेक्षकांसमोर येतील. (New Movie) हल्ली प्रादेशिक चित्रपट पॅन इंडिया स्तरावर पोहोचत आहेत आणि मुळात मराठी चित्रपटांचा आशय हा अत्यंत दर्जेदार असतो. त्यामुळे मराठी चित्रपटांना एका वेगळ्या उंचीवर नेण्याचा आमचा प्रयत्न आहे. या निमित्ताने मराठी चित्रपट पॅन इंडिया स्तरावर पोहोचतील’.