देशांतर्गत हवाई प्रवास करणाऱ्यांसाठी नवीन ऑफर; मोफत करू शकाल ‘हे’ काम

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। देशांतर्गत हवाई प्रवास करणारांसाठी विमान कंपनी स्पाईसजेटने आपल्या प्रवाशांसाठी एक ऑफर आणली आहे. या ऑफरचे नाव ‘झिरो चेंज फी’ असे आहे. याचा फायदा केवळ घरेलू यात्रा करणाऱ्या प्रवाशांना मिळणार आहे. हि ऑफर केवळ अशा लोकांसाठी आहे ज्या लोकांना आपल्या प्रवासाच्या तारखेमध्ये अथवा नावात बदल करायचा आहे, अशा लोकांना आता हि सुविधा मोफत मिळणार आहे. यापूर्वी या कामासाठी पैसे लागत होते.

या ऑफरचा फायदा घेण्यासाठी प्रवाशांना आपल्या यात्रेच्या सात दिवस आधी या प्रक्रियेसाठी अर्ज करावा लागणार आहे. आणि आपल्या यात्रेच्या नावात आणि तारखेत केवळ एकदाच बदल करू शकता. हि ऑफर २७ मार्च पासून ४ एप्रिल पर्यंत आणि २७ मार्चपासून ३० जुन च्या मधल्या काळातिलच यात्रेसाठी लागू असणार आहेत. या काळात आपल्या नावात आपण एकदा बदल करू शकता. यासाठी तुम्हाला कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही.

सोबतच, स्पाइसजेटच्या काही सेवांवरती मिळणार आहेत काही सुविधा!

या ऑफर सोबतच स्पाईसजेट एरलाईन्सने अजून काही सुविधांवर डिस्काउंट देणे सुरु केले आहे. जर प्रवासादरम्यान आपण जेवण आणि आपल्या मानपसंतीची सीट मिळवण्यासाठी पहिल्यांदा बुकिंग केले तर आपल्या डिस्काउंट मिळू शकणार आहे. यासोबतच डिस्काउंट सहित आपण जेवण आणि आपले मनपसंत जेवण केवळ २४९ रुपयांना मिळवू शकणार आहात.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी हॅलो महाराष्ट्र सोबत जोडले जा. आम्हाला फॉलोअ करा  WhatsApp Group | Facebook Page

Click Here to Join Our WhatsApp Group

You might also like