नवा आदेश : हॉटेल व रेस्टॉरंटची सेवा पूर्णत: बंद, पार्सल सोयही पूर्णपणे बंद : जिल्हाधिकारी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | कोरोना विषाणूंचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, सातारा जिल्हयात जिल्हादंडाधिकारी शेखर सिंह यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 मधील तरतूदीनुसार दि .22 मे च्या आदेशानुसार दिनांक 1 जून पर्यंत सुधारित आदेश जारी केले आहेत. या आदेशात पुढील प्रमाणे दुरुस्ती करण्यात येत आहे. “ कोणासही हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये सेवाघेणेसाठी किंवा पार्सल घेणेसाठी येता येणार नाही. हॉटेल, रेस्टॉरंटसाठी घरपोच सेवा बंद राहतील. बार करीता घरपोच सेवा लागू राहणार नाही.”

यापूर्वी दिलेल्या आदेशात आवारामध्ये वास्तव्यास असलेल्या आणि हॉटेलचा भाग असलेल्या अंतर्गत प्रवाशांसाठी रेस्टॉरंट सुरू राहील. तसेच हॉटेल, रेस्टॉरंटसाठी फक्त घरपोच सेवा सुरू राहतील असे म्हटले होते. तसेच कर्मचाऱ्यांना पार्सल देण्यास मुभा देण्यात आलेली होती. त्यासाठी केवळ त्यांचे लसीकरण लवकरात लवकर करून घेण्यासाठी सूचना दिल्या होत्या.

मात्र 25 मे रोजी सायंकाळी जिल्हाधिकारी यांनी हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये सेवाघेणेसाठी किंवा पार्सल घेणेसाठी येता येणार नाही. हॉटेल, रेस्टॉरंटसाठी घरपोच सेवा बंद राहतील. बार करीता घरपोच सेवा लागू राहणार नाही, असा सुधारित नवा आदेश दिलेला आहे.

Leave a Comment