शेतकरी एकजुटीसाठी नव्या क्रांतीची सुरुवात; ‘7/12 कोरा कोरा’ यात्रेतून बच्चू कडूंचा 138 किमी पायी प्रवास

Bachhu Kadu Padyatra
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अमरावती प्रतिनिधी । शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी गेल्या सात दिवसांपासून सुमारे 138 किलोमीटर पायी प्रवास पूर्ण करत प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष तथा माजी मंत्री बच्चू कडू यांची पदयात्रेचा आज समारोप होत आहे. ७/१२ कोरा कोरा या यात्रेच्या माध्यमातून बच्चू भाऊंनी आज शेतकरी एकजुटीसाठी नव्या क्रांतीची सुरुवात केली आहे. शेतकरी एक झाला, जात, पात, धर्म आणि राजकीय विचार बाजूला ठेऊन शेतकरी एकवटला तर त्याला रोखण्याची ताकद कोणातच नाही. म्हणूनच जाती-पातीत आणि वेगवेगळ्या पक्षाच्या झेंड्यांखाली विखुरलेल्या शेतकऱ्याला एकत्र करण्यासाठी बच्चू भाऊंनी ७/१२ कोरा यात्रा काढली आहे. त्यांच्या या यात्रेस गावागावातील शेतकऱ्यांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे.

७ दिवस शेकडो किमी, हजारो पावलं, आणि एकच आवाज – शेतकऱ्याचा हक्क!

देशाचे पहिले कृषिमंत्री पंजाबराव देशमुख यांचे जन्मगाव पापळ ते देशातील पहिली नोंदणी झालेली आत्महत्या स्व. साहेबराव करपे यांचे गाव चिलगव्हाण अशी यात्रा काढून बच्चू भाऊंनी शेतकरी कष्टकरी वर्गाला एक करन नव्या क्रांतीची सुरुवात केली आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या भूमीतून ७/१२ कोरा पदयात्रा काढून नाईक साहेबांच्या शेतकरी भिमुक धोरणांची आठवन आत्ताच्या गेंड्याचे कातडे असलेल्या आणि फक्त मोठ्या उद्योगपतींचा नफा पाहणाऱ्या सरकारला करून दिली आहे. ही तर फक्त सुरुवात, ट्रेलर आहे पिक्चर अजून बाकी आहे. येणाऱ्या काळात बच्चूभाऊ संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत.

सध्या देशात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात होत आहेत. मागील ३ महिन्यांत महाराष्ट्रात ७६७ शेतकऱ्यांनी आत्महत्या करून आपले जीवन संपवले आहे. दर ८ तासांनी १ शेतकरी आत्महत्या करतो आहे. मात्र, फडणवीस साहेब समित्यांवर समित्या नेमून कर्जमाफी पुढे ढकलत आहेत. सरकारला अजून किती शेतकऱ्यांचे मुडदे पडलेले पाहायचे आहेत? असा प्रश्न यामुळे उपस्थित होतो आहे. त्यामुळे सरकारला वठणीवर आणायचे असेल तर शेतकरी एकजुटीशिवाय पर्याय नाही.

म्हणून बच्चूभाऊंच्या या नव्या क्रांतीची सुरवात महाराष्ट्रातील शेतकरी कष्टकरी यांच्या जीवनात आनंद आणण्यासाठी आहे हे लक्षात घेतले पाहिजे. बच्चूभाऊंची लढाई गरीबाच्या घरात पैसे आणण्यासाठी आहे. त्यामुळे आता संपूर्ण कर्जमाफीसह सर्व मागण्या मान्य झाल्याशिवाय आता थांबायचं न्हाय.