पुणे | करोनाच्या दुसऱ्याला लाटेमधील प्रचंड रुग्णसंख्या पाहता शासनाने ‘ब्रेक द चेन’ या अंतर्गत राज्यामध्ये संचारबंदी लागू केली. पुणे महानगरपालिका आयुक्तांकडून पुणे शहरासाठी सुधारित नियमावली जाहीर करून करून कडक अंमलबजावणी करणे सुरू केले आहे. यामुळे महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांनी सुधारित आदेश निर्गमित केले आहेत. काय आहेत हे सुधारित आदेश याबत जाणून घेऊ.
सर्व ऑक्सिजन प्रोडूसर कंपन्यांनी 100% ऑक्सिजनचा पुरवठा हा फक्त वैद्यकीय कारणासाठी करण्यात यावा. तसेच कंपन्यांनी ऑक्सिजनचा वापर करणारे आणि ऑक्सिजनचा पुरवठा करणारे यांची यादी प्रसिद्ध करावी, पुणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये अत्यावश्यक सेवेच्यासाठी परवानगी असलेल्या कंपन्यांनी आणि त्यासाठी गरजेच्या दुकाने सुरु ठेवण्यात येईल, ई-कॉमर्स मार्फत घरपोच सुविधा देणारे कर्मचारी, हॉटेल, बार, रेस्टॉरंट, खाजगी वाहतूक करणारे वाहन चालक, मालक दैनिक वर्तमानपत्रे, नियतकालिके, मासिके साप्ताहिक, इत्यादीची छपाई व वितरण करणारे कर्मचारी, घरगुती काम करणारे कामगार, वाहक, चालक, स्वयंपाकी, ज्येष्ठ नागरिक आणि घरी आजारी असणाऱ्या लोकांना सेवा देण्यासाठी वैद्यकीय मदत देणारे कर्मचारी या सर्वांनी भारत सरकार द्वारा निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार लवकरात लवकर त्यांनी लसीकरण करून घ्यावे.
पुणे महानगरपालिका क्षेत्रातील मध्य विक्रीची दुकाने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या नियमाप्रमाणे होम डिलिव्हरी सुविधा सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेत सुरू राहतील. चष्म्याची दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत सुरू राहतील. संदर्भीय आदेशान्वये वेळोवेळी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचना पुढील आदेशापर्यंत लागू राहतील. तसेच पुणे महानगरपालिकेने यापूर्वी निर्गमित केलेले आदेश मार्गदर्शक सूचना पुढील आदेशापर्यंत लागू राहणार आहेत. याचे काटेकोर पणे पालन करणे बंधनकारक असणार आहे. अन्यथा हे नियम मोडणाऱ्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.