एअरटेलचे नवीन नियम जारी! ताबडतोब हे काम करा अन्यथा तुमचे सिमकार्ड होईल बंद..

0
1
Airtel
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| नुकतेच टेलिकॉम कंपनी एअरटेलने (Airtel) आपल्या प्रीपेड ग्राहकांसाठी नवीन नियम लागू केले आहेत. या नवीन नियमानुसार, एअरटेलचे सिम सक्रिय ठेवण्यासाठी किमान रिचार्ज करणे अनिवार्य असणार आहे. यापूर्वी कमी किमतीच्या रिचार्जद्वारे सिम सुरू ठेवणे शक्य होते. मात्र आता कंपनीने किमान रिचार्ज रक्कम निश्चित केली आहे. ही किंमत कोणती आहे आपण जाणून घेऊया.

काय आहेत नवीन नियम?

नवीन नियमानुसार, एअरटेल सिम सक्रिय ठेवण्यासाठी ग्राहकांना किमान 128 रुपये किंवा त्याहून अधिक किमतीचे रिचार्ज करणे बंधनकारक असणार आहे. सध्या उपलब्ध असलेल्या सर्वात कमी किमतीच्या प्रीपेड प्लॅनची किंमत 199 रुपये आहे. परंतु यापूर्वी किमान रिचार्ज 155 रुपये होता, जो आता 128 रुपयांपर्यंत कमी करण्यात आला आहे. मात्र एअरटेल सिमचा नियमित वापर न केल्यास कंपनी सिम बंद करू शकते.

रिचार्ज न केल्यास सिम बंद होणार

ग्राहकाने एअरटेल सिमवर ठरावीक कालावधीत कोणताही रिचार्ज केला नाही, इनकमिंग किंवा आउटगोइंग कॉल झाले नाहीत तर ते सिम बंद पडू शकतो. तसेच, त्या सीमवरून एसएमएस पाठवले नाहीत किंवा इंटरनेट डेटा वापरण्यात आला नाही तरी देखील कंपनी सिम बंद करू शकते.

सिम बंद झाल्यास काय होईल?

कंपनीने सांगितले आहे की, सलग 90 दिवस कोणताही वापर न केल्यास सिम बंद होऊ शकते. मात्र, एअरटेल ग्राहकांना 15 दिवसांचा अतिरिक्त ग्रेस पीरियड देते. या कालावधीत किमान 20 रुपये खात्यात असल्यास सिम पुन्हा सक्रिय करता येते. जर या 15 दिवसांतही कोणताही रिचार्ज किंवा कॉल झाला नाही, तर एअरटेल तो नंबर कायमस्वरूपी बंद करून तो दुसऱ्या ग्राहकाला देऊ शकते.

त्यामुळेच सिम सक्रिय ठेवण्यासाठी दर ९० दिवसांतून एकदा किमान १२८ रुपयांचा रिचार्ज करावा. नियमितपणे कॉल, एसएमएस पाठवणे किंवा इंटरनेट डेटा वापरावा. खात्यात किमान २० रुपये शिल्लक ठेवावेत.