आज पासून औरंगाबादमध्ये नवीन नियम लागू; फक्त ७ ते ४ दुकाने सुरु

औरंगाबाद : राज्यातील डेल्टा प्लस व्हेरिएंटचा धोका लक्षात घेऊन कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी सर्व जिल्हयांना लेव्हल-3 अंतर्गत दिलेल्या निर्बंधांचे पालन करण्यासाठी आदेश देण्यात आले आहेत. औरंगाबाद शहरात आता सायंकाळी 5 वाजेपर्यंत जमावबंदी व त्यानंतर सकाळी 7 वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने नागरिकांनी सर्व नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले आहे.

औरंगाबाद जिल्हयातील कोविड -19 विषयक बाधित परिस्थिती लक्षात घेऊन व प्राप्त वैद्यकीय अहवालाच्या आधारे जिल्हयातील शहरी रुग्णांची टक्केवारी 1.31 टक्के व ग्रामीण रुग्णांची टक्केवारी 59 टक्के ऐवढी असून एकूण औरंगाबाद जिल्हयांतील रुग्णांची टक्केवारी 2.13 टक्के असून व्यापलेल्या ऑक्सिजन बेडची औरंगाबाद शहराची टक्केवारी 6.39 टक्के व ग्रामीण बेडची टक्केवारी 2.96 टक्के अशी एकूण ऑक्सीजन बेडची औरंगाबाद शहराची टक्केवारी 6.02 टक्के आहे.

जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, औरंगाबाद, पोलीस आयुक्त औरंगाबाद शहर व महानगरपालिका आयुक्त औरंगाबाद यांच्या संयुक्त स्वाक्षरीने औरंगाबाद जिल्हा क्षेत्राकरिता 29 जुन पासून सकाळी 7 वाजेपासून पुढील आदेशापर्यंत खालीलप्रमाणे निर्बंध बाबत लागू करण्यात आले आहेत.