भारत विरुद्ध श्रीलंका मालिकेचे नवे वेळापत्रक जाहीर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – टीम इंडिया सध्या श्रीलंका दौऱ्यावर आहे. या दौऱ्याच्या नियोजित वेळापत्रकानुसार 13 जुलै रोजी या दौऱ्यातील पहिली वन-डे होणार होती. मात्र श्रीलंका टीमच्या सपोर्ट स्टाफमधील दोघांना कोरोनाची लागण झाल्याने हि वन-डे मालिका 18 जुलै रोजी होणार आहे. याची अधिकृत घोषणा शनिवारी करण्यात आली आहे.

भारत विरुद्ध श्रीलंका यांच्या मालिकेचे नवे वेळापत्रक नुकतेच जाहीर करण्यात आले. या वेळापत्रकानुसार 18 जुलै रोजी पहिली वन-डे होणार आहे. दुसरी वन-डे 20 जुलै तर तिसरी वन-डे 23 जुलै रोजी होणार आहे. टी20 सीरिजमधील पहिला सामना 25, दुसरा सामना 27 तर तिसरा सामना 29 जुलै रोजी होणार आहे. हे सगळे सामने कोलंबोमध्ये खेळवण्यात येणार आहे.

या अगोदर श्रीलंकेचे बॅटींग कोच ग्रँट फ्लॉवर आणि सपोर्ट स्टाफ जीटी निराशेन या दोघांना कोरोनाची लागण झाली आहे. यामुळे श्रीलंका क्रिकेट बोर्डाने हि मालिका पुढे ढकलण्याची विनंती बीसीसीआयला केली होती. बीसीसीआयने ती विनंती मान्य केली होती. यानुसार मालिकेचे नवे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

Leave a Comment