औरंगाबाद | डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या काही परीक्षांच्या संदर्भात नवीन नियमावली तयार करण्यात आली आहे. याबाबत कुलगुरू डॉक्टर प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठाच्या विद्या परिषदेची मंगळवारी बैठक घेण्यात आली.
एमएससी वनस्पतीशास्त्र आणि एमएससी इलेक्ट्रॉनिक विषयाच्या सुधारित अभ्यासक्रम प्रात्यक्षिकांसाठी नवीन सूचना तयार करण्यात आल्या आहे. त्याचबरोबर बीसीएम, सेंद्रिय शेती, बी व्होक, शारीरिक शिक्षण आणि क्रीडा बँकिंग अभ्यासक्रमाला देखील मान्यता देण्यात आली. आणि एमफील, पीएचडीसाठी सुधारित स्वतंत्र नियमावलीही मंजुरी देण्यात आली आहे. पदव्युत्तर पदवीच्या अभ्यासक्रमांमध्ये भारतीय संविधान हा विषय बंधनकारक होता. आता हाच विषय पदवी स्तरावर देखील घेण्यात यावा असे मत डॉ. येवले यांनी बैठकीत मांडले होते. याचा फेरविचार करून विद्या परिषद बैठकीत या विषयाला मंजूरी देण्यात आला. आता पदवीसाठी भारतीय संविधान हा विषय बंधनकारक असणार आहे.
मिलेनियम इन्स्टिट्यूट ऑफ द मॅनेजमेंट येथील एमबीए एमसी हा अभ्यासक्रम रद्द करण्यात आला असून उस्मानाबाद परिसर व समाजकार्य महाविद्यालयात नवीन अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी तयार केलेल्या प्रवेश निदर्शनांना मंजुरी देण्यात आली आहे. त्याचबरोबर शैक्षणिक सत्राच्या 2021 22 चे वेळापत्रक मंजूर करण्यात आले आहे. आता 30 ऑगस्ट पासून नवीन सत्र सुरू करणार असून 1 ऑक्टोंबर पासून तासिका सुरू करण्यात येणार आहे. यावेळी प्र-कुलगुरू डॉक्टर श्याम शिरसाट कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी आदींची उपस्थिती होती.