यंदा महाराष्ट्राच्या मॉरेशिअसमध्ये साजरे करा नवीन वर्ष; जाणून घ्या सविस्तर माहिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | 2025 हे वर्ष सुरू होण्यासाठी अगदी काहीच दिवस शिल्लक राहिलेले आहेत. नवीन वर्षामध्ये अनेक लोक त्यांच्या फॅमिली सोबत फिरायला जाण्याचा प्लॅन करत असतात. नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी सगळेच कुठे तरी फिरायला जात असतात. अनेक वेळा लोक महाराष्ट्राच्या किंवा देशाच्या बाहेर जाऊन नवीन वर्षाचे स्वागत करतात. परंतु जर तुम्ही देखील यावर्षी परदेशात जाण्याचा विचार करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण तुम्ही महाराष्ट्राच्या मॉरिशसला भेट देऊन तुमचे नवीन वर्ष नक्की करू शकता. महाराष्ट्राचा मॉरिशस म्हणजे कोकणचा तारकर्ली समुद्रकिनारा आहे. हा समुद्रकिनारा मोठ्या प्रमाणात पसरलेला आहे. अनेक लोक या ठिकाणी जात असतात.

महाराष्ट्रात मालवण जवळ असणारा हा तारकर्ली समुद्र किनारा खूप प्रसिद्ध आहे. या ठिकाणचे पाणी तसेच समुद्रकिनारी अत्यंत स्वच्छ आणि नितळ आहे. त्यामुळे पर्यटकांमध्ये हे ठिकाण लोकप्रिय झालेले आहे. इथे पाण्यामध्ये तुम्हाला स्कुबा डायव्हिंग करता येते. त्याचप्रमाणे इतर काही ऍक्टिव्हिटीज करण्यासाठी अनेक लोक या ठिकाणी येत असतात. तसेच स्वच्छ पाण्यामुळे समुद्राच्या आतमध्ये जाण्याची संधी देखील प्रत्येकाला मिळते. जर तुम्ही देखील यावर्षी तारकर्ली या जाण्याचा विचार करत असाल, तर आता या ठिकाणी नक्की तुम्हाला कोणत्या गोष्टी पाहता येईल. या ठिकाणी कसे जायचे याबद्दलची माहिती जाणून घेऊया.

तारकर्लीला कसे जायचे ?

तारकर्लीला जाण्यासाठी तुम्ही सिंधुदुर्ग किंवा कुडाळ या बस स्थानकावर उतरून बस पकडून मालवणला जाऊ शकता. तुम्ही मालवणमध्ये देखील राहू शकता किंवा. तुम्ही तारकर्लीला जाऊन एखाद्या हॉटेलमध्ये राहू शकता. मालवण आणि तारकर्ली यामध्ये केवळ सात किलोमीटरच्या अंतर आहे. तिथे जाण्या येण्यासाठी रिक्षा एसटी यांसारखे अनेक पर्याय आहेत. परंतु तारकर्ली मध्ये खूप गर्दी असते. त्यामुळे हॉटेल्स बुकिंग या गोष्टी मर्यादित असतात. त्यामुळे जाण्याआधीच तुम्ही हॉटेल बुकिंग करून तुमचा वेळ वाचवू शकता.

तुम्हाला तारकर्ली मध्ये गेल्यावर मालवण, सिंधुदुर्ग, तारकर्ली असा सगळा परिसर पाहिला असेल, तर तुमच्याकडे दोन ते तीन दिवसांचा अवधी असणे गरजेचे असते. फक्त तारकर्लीमध्ये देखील अनेक गोष्टी पाहण्यासाठी आहे. इथे अनेक पॉईंट देखील आहे. यामध्ये तुम्हाला बोटिंगचा अनुभव घेता येईल. तसेच बोटिंगच्या राउंड ट्रीपसाठी एका फॅमिलीला जवळपास हजार ते दीड हजार रुपये द्यावे लागतात. बोटीने तुम्हाला 15 किलोमीटर अंतरावर फिरवले जाते. यामध्ये तुम्हाला डॉल्फिन पॉईंट, गोल्डन रॉक्स, त्सुनामी आयलंड, संगम अशी चार ठिकाणी पाहायला मिळतील. यासोबतच अत्यंत निसर्गरम्य असणाऱ्या वातावरण तसेच समुद्राचे स्वच्छ पाणी यांसारख्या अनेक गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतात. त्यामुळे तुम्ही जर या नवीन वर्षात मालवणला जाण्याचा विचार करत असाल, तर तुम्ही नक्कीच भेट देऊ शकता.