न्यूझीलंडच्या एजाज पटेलचा विश्वविक्रम !! सर्वच्या सर्व 10 विकेट घेतल्या

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | न्यूझीलंडचा फिरकीपटू एजाज पटेलने भारताविरुद्ध च्या दुसऱ्या कसोटी सामन्यात सर्वच्या सर्व 10 बळी घेत नवा विश्वविक्रम केला आहे. एजाज पटेलच्या पूर्वी भारताचा माजी फिरकीपटू अनिल कुंबळे आणि इंग्लंड चा जीम लेकर यांनी अशी कामगिरी केली होती

मुंबई येथील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना 325 धावा केल्या. यावेळी अखेरचा फलंदाज मोहम्मद सिराज याला बाद करत एजाज पटेल ने विश्वविक्रम केला.

एजाज पटेलने दुसऱ्या कसोटीत 47.5 षटके टाकली आणि 12 षटके निर्धाव टाकत 119 धावांत 10 विकेट्स घेण्याची अप्रतिम कामगिरी केली. न्यूझीलंडच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासात एजाजने हा अद्भुत पराक्रम करून आपले नाव इतिहासाच्या पानात नोंदवले .

You might also like