अबब !! चक्क पंतप्रधानांनाच रेस्टॉरंटमध्ये प्रवेश नाही

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आपल्या रेस्टॉरंटमध्ये नेते मंडळीनी स्टार्सनी तसेच व्हीआयपींनी हजेरी लावावी यासाठी अनेकजण प्रयत्नशील असतात. त्यांच्यासाठी काही खास आदरातिथ्याचे आयोजनही केले जाते. मात्र, एका देशात एका रेस्टॉरंटमध्ये चक्क देशाच्या पंतप्रधानांनाच प्रवेश नाकारण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. हे घडले न्यूझीलंड या देशामध्ये. न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा अर्डर्न यांना राजधानी वेलिंग्टनमधील एका रेस्टॉरंटमध्ये शनिवारी चक्क प्रवेश नाकारण्यात आला.

त्याचे झाले असे की न्यूझीलंडमध्ये लॉकडाउनचे निर्बंध काही प्रमाणावर शिथिल करण्यात आले आहे. मात्र यानंतरही काही नियमांसह रेस्टॉरंटस सुरू करण्यात आली आहेत. रेस्टॉरंटमध्ये सुरक्षेच्या नियमांचे पालन करण्यात येत असून, येथे दोन व्यक्तींमध्ये एक मीटरचे अंतर राखणे आवश्यकच आहे. त्यानुसार अनेक रेस्टॉरंटमधल्या बैठक व्यवस्थेतही बदल करण्यात आलेले आहेत. अलीकडेच न्यूझीलंडच्या पंतप्रधान अर्डर्न आणि त्यांचा प्रियकर क्लार्क गेफोर्ड हे ‘ऑलिव्ह’ रेस्टॉरंटमध्ये ब्रेकफास्टसाठी गेले होते. मात्र, रेस्टॉरंटमध्ये जागा उपलब्ध नसल्यामुळे त्यांना आत सोडण्यात आले नाही. यानंतर पंतप्रधानांनीही रेस्टॉरंटजवळ सामान्य लोकांप्रमाणेच उभे राहून जागा मोकळी होण्याची वाट पाहिली, असे त्यांच्या कार्यालयाच्या प्रवक्त्यांनी म्हटले आहे.

Trevor Hancock: New Zealand leads the way by focusing on quality ...

न्यूझीलंडमध्ये या लॉकडाउनच्या काळात नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पंतप्रधान जेसिंडा अर्डर्न यांनी आपल्याच मंत्रिमंडळातील एका सहकाऱ्यावर कारवाई देखील केली होती. कोरोनावर नियंत्रण ठेवण्यात यशस्वी झालेल्या काही मोजक्याच देशांमध्ये न्यूझीलंड या देशाचा समावेश होतो. न्यूझीलंडमध्ये आतापर्यन्त १४९९ जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची नोंद असून त्यामुळे २१ जणांचा मृत्यू झाला. तर, १४३३ जणांवर यशस्वी उपचार करण्यात आले असून सध्या फक्त ४५ जणांवर उपचार सुरु आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.

Leave a Comment