IPL मध्ये खेळण्यासाठी न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने खेळाडूंना दिली परवानगी, पण…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | आयपीएलच्या तेराव्या हंगामात सहभागी होणाऱ्या न्यूझीलंडच्या सहाही खेळाडूंना, न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने ना हरकत प्रमाणपत्र देण्याचं ठरवलं आहे. मात्र करोना विषाणूच्या प्रादुर्भावाचा मुद्दा लक्षात घेता आरोग्याची काळजी आणि सर्व सरकारी नियम पाळण्याची जबाबदारी ही खेळाडूंवर असेल असंही न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने स्पष्ट केलंय. न्यूझीलंडच्या संघाचे सहा खेळाडू यंदाच्या आयपीएलमध्ये खेळणार आहेत.

केन विल्यमसन (सनराईजर्स हैदराबाद),मिचेल मॅक्लेनघन आणि ट्रेंट बोल्ट (मुंबई इंडियन्स),मिचेल सँटनर (चेन्नई सुपरकिंग्ज) ,जिमी निशम (किंग्ज इलेव्हन पंजाब), लॉकी फर्ग्युसन (कोलकाता नाईट रायडर्स), हे सहा किवी खेळाडू IPL मध्ये प्रतिनिधित्व करतात.

“आयपीएलमध्ये सहभागी होणाऱ्या सहा न्यूझीलंड खेळाडूंना क्रिकेट बोर्डाने ना हरकत प्रमाणपत्र देण्याचं ठरवलं आहे. मात्र स्पर्धेतील सहभागाबद्दल अंतिम निर्णय हा त्यांचा असेल”, अशी माहिती न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाचे प्रवक्ता रिचर्ड बूक यांनी पीटीआयला इ-मेल द्वारे दिली. भारतात करोना विषाणूमुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता यंदाचं आयपीएल हे युएईमध्ये भरवलं जाणार आहे. सप्टेंबर ते नोव्हेंबर या काळात आयपीएलचा तेरावा हंगाम खेळवला जाईल. स्पर्धेच्या आयोजनाबद्दल अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसली तरीही बीसीसीआयने स्पर्धेसाठी तयारी सुरु केलेली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment