Video: भूकंपाचे हादरे बसत असताना सुद्धा ‘या’ पंतप्रधान मुलाखात देतच राहिल्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वेलिंग्टन । कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साऱ्या जगासमोर गेल्या काही महिन्यांपासून आपल्या वागण्याबोलण्याने आदर्श प्रस्थापित करणाऱ्या न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा अर्डर्न सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. त्याचण्याविषयीच्या चर्चेबाबतच कारण म्हणजे भूकंप. थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून सुरु असणाऱ्या एका मुलाखतीदरम्यान, भूकंप आलेला असताना यावेळी जेसिंडा त्यावरची प्रतिक्रिया अनेकांनाच आश्चर्यचकित करून टाकणारी आहे.

न्यूजहबचे सूत्रसंचालक रायन ब्रिज यांना मध्येच थांबवत त्यांनी वेलिंग्टनच्या परिसरात काय होत होतं याविषयी सांगितलं. ‘रायन, इथे भूकंप येत आहे. थोडासा हादरा बसत आहे’, आपल्या आजूबाजूला पाहत पंतप्रधानांचे हे उद्गार अनेकांच्या भुवया उंचावून गेले. सूत्रसंचालकांना आपण असणाऱ्या खोलीमधील वस्तू हलताना दिसत असल्याचं सांगणाऱ्या या पंतप्रधानांचा व्हिडिओ सोशल मीडियावर कमालीचा व्हायरल होत होत आहे.

सोमवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास देशातील अनेक नागरिकांना भूकंपाचा हादरा जाणवला. हा हादरा इतका ताकदीचा होता की, मांडणीतील समानही खाली पडलं. दरम्यान, मुलाखतीदरम्यानच भूकंप अल्यामुळे त्याविषयी माहिती देत तो थांबल्यानंतरही जेसिंडा यांनी वृत्तनिवेदकांना याबाबत सूचित केल्याचं पाहायला मिळालं.

न्यूझीलंड हा देश पॅसिफिक रिंग ऑफ फायरवर स्थित आहे. त्यामुळं केव्हा केव्हा इथे येणाऱ्या भूकंपांना शेईक आईल्स म्हणूनही संबोधलं जातं. अमिरिकेकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या भूगर्भशास्त्र अहवालानुसार सोमवारी पॅसिफिक महासागरात ५.६ रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा भूकंप आला होता. वेलिंग्टनपासून हे ठिकाण जवळपास १०० किलोमीटरच्या अंतरावर होतं.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”

 

Leave a Comment