आ.थोरांताविरोधात इंदुरीकर महाराज निवडणूक लढविणार ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

संगमनेर |येत्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. बाळासाहेब थोरात यांच्या विरोधात प्रसिद्ध समाजप्रबोधनकार इंदुरीकर महाराज निवडणूक रिंगणात उतरणार अशी दबक्या आवाज चर्चा होती. मात्र आज शुक्रवारी संगमनेर येथील मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेच्या सभेत इंदुरीकर महाराजांनी हजेरी लावल्याने इंदुरीकर महाराज थोरातांविरोधात निवडणूक रिंगणात उतरण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

थोरातांविरोधात इंदुरीकर महाराज रिंगणात उतरणार या दबक्या आवाजातील चर्चेला आजच्या इंदुरीकरांच्या उपस्थितीमुळे हवा मिळाली आहे. इंदुरीकर महाराज हे निवडणूक रिंगणात उतरल्यास संगमनेरची विधानसभा निवडणूक राज्यात लक्षवेधी ठरणार आहे. इंदुरीकर महाराज यांना युतीकडून उमेदवारीची ऑफर असल्याचेही समजते.

युतीच्या काही मोठ्या नेत्यांनी इंदुरीकरांची आतापर्यंत दोन तीनवेळेस भेट घेवून त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न केल्यानेच इंदुरीकर आज मुख्यमंत्र्यांच्या व्यासपीठावर आल्याचे मानले जाते.

Leave a Comment