NHAI : राज्यभरामध्ये रस्त्यांचे जाळे सर्वत्र पोहचावे , मोठ्या मोठ्या शहरांना छोटी शहरे जोडली जावीत त्यातून त्या भागातील औद्योगीक विकासाला चालना मिळावी या उद्देशाने अनेक मोठे रस्ते प्रोजेक्ट हाती घेतले जात आहेत. समृद्धी महामार्ग , शक्तीपीठ हायवे असे मोठे प्रोजेक्ट राज्यात तयार करण्यात येत आहेत. अटल सेतू सारखे रस्ते राज्याच्या विकासात भर घालत आहेत. असे असताना आता (NHAI) मध्य भारताला दक्षिण पूर्व भारताशी जोडण्यासाठी प्रस्तावित करण्यात आलेल्या नागपूर ते विजयवाडा या 457 किलोमीटर लांबीच्या महत्त्वकांक्षी महामार्ग प्रकल्पाचा देखील रस्ते प्रकल्पांमध्ये समावेश करण्यात आला आहे. आज आपण याच महामार्गाविषयी माहिती घेऊया…
नागपूर-विजयवाडा इकॉनॉमिक कॉरिडॉर
नागपूर – विजयवाडा इकॉनॉमिक कॉरिडॉर 457 किमी लांबीचा आहे, या मार्गाला नागपूर-विजयवाडा एक्सप्रेसवे (NHAI) म्हणूनही ओळखले जाते. हा महामार्ग NHAI द्वारे महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशमधून मार्ग संरेखित केला आहे. हा 4 लेन प्रवेश-नियंत्रित रस्ता आहे.
या कॉरिडॉरचे बांधकाम (ब्राऊनफिल्ड-अपग्रेड आणि ग्रीनफिल्डचे संयोजन) भारतमाला परियोजना फेज-1 कार्यक्रमांतर्गत मालवाहतुकीची (NHAI) कार्यक्षमता सुधारणे आणि बंदर कनेक्टिव्हिटीद्वारे निर्यातीला चालना देण्याचे प्राथमिक उद्दिष्ट ठेवून केले जात आहे.
NHAI ने अद्याप प्रकल्पाचा तपशीलवार प्रकल्प अहवाल (DPR) ऑनलाइन उपलब्ध केलेला नाही. हा आर्थिक कॉरिडॉर 2027 पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन आहे.
या भागातून जाणार मार्ग (NHAI)
हा मार्ग चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील बोडखा, मांडव गोराड चेक मकसुर, वनली, चेक कवडापूर, बोरगाव हिरापूर, लोणार (धोटे), सूमठाणा, पांढरतळा, पाचगाव, आसाळा, बांद्रा, सालोरी – खातोडा, परसोडा जामगाव खुर्द, जामगाव बुद्रुक या गावांमधून (NHAI) जाणार आहे. तसेच भद्रावती तालुक्यातील कोंढा, विजासन, चारगाव कुणाडा या भागातून जाणार आहे.
प्रकल्पाची माहिती
- एकूण अंदाजित खर्च: रु. 14,666 कोटी
- प्रकल्पाची एकूण लांबी: 457 किमी
- लेन: 4
- अंतिम मुदत: 2027
- मालक: भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI)
- प्रोजेक्ट मॉडेल: हायब्रीड ॲन्युइटी मोड (HAM)