UPSC Recruitment 2024 | UPSC अंतर्गत होणार तब्बल 120 जागांची भरती, जाणून घ्या रिक्त पदांचा तपशील

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

UPSC Recruitment 2024 | स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक अतिशय आनंदाची बातमी आलेली आहे. ती म्हणजे आता UPSC अंतर्गत एक मोठी भरती होणार आहे. जर तुम्ही अजूनही यासाठी अर्ज केला नसेल तर तुम्ही लगेच जाऊन अर्ज करू शकता. कारण अर्ज करण्याची शेवटची तारीख जवळ आलेली आहे. यामध्ये सहाय्यक संचालक किंवा शास्त्रज्ञ पदाच्या जागा भरल्या जाणार आहे. यासाठी तुम्ही यूपीएससीच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन या रिक्त पदांसाठी अर्ज करू शकता आता याबद्दल सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया.

अर्ज करण्याची शेवटची तारीख

29 फेब्रुवारी 2024 ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे आता तुम्ही लवकरात लवकर जाऊन अर्ज करा.

रिक्त पदांचा तपशील लोकसेवा आयोगाच्या या भरती अंतर्गत विविध रिक्त जागांसाठी 120 जागांवर नियुक्त केल्या जाणार आहे यामध्ये सहाय्यक संचालक, वैज्ञानिक ब प्रशासकीय अधिकारी श्रेणी I या पदांचा समावेश असणार आहे.

  • सहाय्यक संचालक : ५१ जागा
  • शास्त्रज्ञ बी (भौतिक नागरी) : ०१ जागा
  • प्रशासकीय अधिकारी श्रेणी I : ०२ जागा
  • शास्त्रज्ञ बी : ०९ जागा
  • विशेषज्ञ श्रेणी III : ०२ जागा
  • अभियंता आणि जहाज सर्वेक्षक सह-उपमहासंचालक -: ०१ जागा
  • विशेषज्ञ श्रेणी III : ०६ जागा
  • स्पेशालिस्ट ग्रेड III : १६ जागा
  • स्पेशालिस्ट ग्रेड III : १९ जागा
  • स्पेशालिस्ट ग्रेड III : ०९ जागा

वयोमर्यादा

या लोकसेवा आयोगाच्या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे वय हे 35 ते 50 वर्ष दरम्यान असणे गरजेचे आहे.

अर्ज शुल्क | UPSC Recruitment 2024

केंद्रे लोक सेवा आयोगाच्या या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांना 25 रुपये शुल्क भरावे लागणार आहे. त्याचप्रमाणे महिला, SC , ST आणि इतर उमेदवारांना कोणत्याही प्रकारचे शुल्क भरावे लागणार नाही.

शैक्षणिक पात्रता

लोकसेवा आयोगाची भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी, बॅचलर ऑफ सायन्स मास्टर ऑफ सायन्स ऑफ मेडिसिन आणि डॉक्टर किंवा मेडिसिन या पदवी एखाद्या मान्यताप्राप्त संस्था किंवा मंडळाकडून घेणे आवश्यक आहे तरच त्यांना अर्ज करता येणार आहे.