दाऊदच्या साथीदारांवर 20 ठिकाणी छापेमारी; NIA ची मोठी कारवाई

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | केंद्रीय तपास यंत्रणा NIA ने डी कंपनीवर मोठी कारवाई केली आहे. दाऊद इब्राहिम आणि त्यांच्याशी संबंधित अनेक जणांवर एनआयएची छापेमारी सुरु आहे. मुंबईतील सांताक्रूझ,मुंब्रा, नागपाडा, गोरेगाव, बोरिवली,भेंडी बाजार सहित सुमारे 20 ठिकाणी छापेमारी सुरु असल्याचे समजते. कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमसाठी हा खूप मोठा झटका मानला जात आहे.

अनेक हवाला ऑपरेटर्स आणि ड्रग्ज पेडलर दाऊदशी संबंधित असल्याची माहिती एनआयएला मिळाली होती. फेब्रुवारीमध्ये या संदर्भात नोंद घेण्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवर आजपासून या कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे, असंही एनआयएकडून सांगण्यात आलं आहे.

सलीम फ्रुट ताब्यात- 

NIA च्या छापेमारीत छोटा शकील, जावेद चिकना, टायगर मेनन, इक्बाल मिर्ची, दाऊदची बहीण हसिना पारकर आणि त्याच्या नातेवाईकांशी संबंधित लोकांचा समावेश आहे. त्यातच आता दाऊद टोळीच्या जवळचा व्यक्ती सलीम फ्रूटला NIAने ताब्यात घेतले आहे. एनआयने सलीमच्या घरावर छापे टाकले आहेत. सलीम फ्रुट हा छोटा शकील चा म्हेवणा आहे