NIA Recruitment 2024 | राष्ट्रीय तपास संस्थेमध्ये 39 पदांसाठी भरती सुरु, जाणून घ्या अर्ज करण्याची पद्धत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

NIA Recruitment 2024 | आजकाल तरुणांना सरकारी नोकरीची खूप मोठ्या प्रमाणत आकर्षण आहे. अनेक तरुण हे सरकारी नोकरीच्या शोधात असतात. जर तुम्ही देखील त्या व्यक्तींपैकी असाल ज्यांना सरकारी नोकरी करायची आहे. त्यांच्यासाठी ही एक अत्यंत महत्त्वाची बातमी आणली आहे. कारण आम्ही तुमच्यासाठी अशाच एका सरकारी नोकरीची माहिती घेऊन आलेलो आहोत. ती म्हणजे राष्ट्रीय तपास (NIA Recruitment 2024)यंत्रणेत सध्या भरती चालू झालेली आहे. यामध्ये नियुक्तीच्या आधारावर मंत्रालय कर्मचारी पदासाठी अर्ज मागवलेले आहेत. त्यामुळे इच्छुकांनी पात्र उमेदवारांनी NIA च्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करा.

रिक्त जागा तपशील

राष्ट्रीय तपास संस्थेने 39 रिक्त पदांसाठी अर्ज मागवले आहे. यामध्ये सहाय्यक पदांसाठी 7 जागा, लघुलेखक श्रेणी I साठी 24 जागा आणि उच्च विभाग लिपिकासाठी 9 जागा रिक्त आहेत.

आवश्यक पात्रता |NIA Recruitment 2024

सहाय्यक पदांसाठी

  • उमेदवारांनी कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यालयातून किंवा विद्यापीठातून पदवी संपादन करणे आवश्यक आहे.
  • त्याचप्रमाणे एसएससीने विहित केलेली संगणक प्रवीणता चाचणी देखील उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.
  • वेतन मॅट्रिक्स मधील स्तर 5 व नियमितपणे नियुक्त्यानंतर प्रदान केलेल्या श्रेणीमध्ये सहा वर्षाची सेवा किंवा पालक संवर्ग समतोल असणे गरजेचे आहे.

स्टेनोग्राफर ग्रेड I पदासाठी

  • अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे पदवी तसेच संगणक शिक्षण महत्वाचे आहे.
  • त्यांना वेतन मॅट्रिक्समधील स्तर 7 वर्ष नियमित पदांवर नियुक्तांनंतर प्रदान केलेल्या श्रेणीमध्ये 6 वर्षाची सेवा किंवा पालक संवर्ग विभागातील समतोल्य असणे गरजेचे आहे.
  • त्याचप्रमाणे लेवल 4 मध्ये नियमितपणे नियुक्त झाल्यानंतर प्रदान केलेल्या श्रेणीमध्ये 10 वर्षे सेवा किंवा पालक संवर्ग वेतन मॅट्रिक्समध्ये समतोल्य असणे गरजेचे आहे.
  • त्याशिवाय 10 मिनिटांसाठी या पदासाठी स्टेनोग्राफीचा वेग 100 शब्द प्रतिमिनिट असावा. तर संगणकावर 40 शब्दप्रति मिनिट आणि वेगाने इंग्लिश टायपिंग आणि 55 शब्द प्रतिमिनिट या वेगाने हिंदी टायपिंग करता आले पाहिजे.

वयोमर्यादा | NIA Recruitment 2024

या पदावर नियुक्तीसाठी अर्ज करण्याचे शेवटच्या तारखेपर्यंत उमेदवाराचे वय हे कमल 56 वर्ष असणे गरजेचे आहे.

नियमित मासिक पगार

स्टेनोग्राफर ग्रेडA च्या पदासाठी ठरवलेल्या उमेदवारांना पे मॅट्रिक्समध्ये लेव्हल सिक्स अंतर्गत दर महिन्याला 35 हजार 400 रुपये ते 1 लाख 12 हजार 400 रुपयेपर्यंत पगार मिळू शकतो. तर अप्पर डिव्हिजन क्लर्कच्या पदांसाठी निवड केलेल्या उमेदवारांचे वेतन मॅट्रिक्समध्ये लेवल 3 अंतर्गत दर महिन्याला 25 हजार 500 रुपये ते 81 हजार रुपये एवढे असू शकते.

अर्ज पाठवण्याचा पत्ता

एसपी प्रशासक एनआयए मुख्यालय सीजीओ कॉम्प्लेक्स लोधी रोड, नवी दिल्ली 110003