निखत जरीनने रचला इतिहास! World Boxing Championship मध्ये सुवर्ण पदक जिंकले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – भारतीय बॉक्सर निखत जरीनने गुरुवारी तुर्कीच्या इस्तंबूल शहरात 12व्या आयबीए महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये (World Boxing Championship) 5-0 असा विजय मिळवून सुवर्णपदक जिंकले. कोट्यवधी देशवासीयांच्या अपेक्षेनुसार निकतने 52 किलो वजनी गटाच्या विजेतेपदाच्या लढतीत थायलंडच्या जितपॉन्ग जुटामासवर एकतर्फी विजय मिळवला.

निखत जरीनने रचला इतिहास
निजामाबाद (तेलंगणा) येथे जन्मलेली ही बॉक्सर सहा वेळा चॅम्पियन एमसी मेरी कोम (2002, 2005, 2006, 2008, 2010 आणि 2018), सरिता देवी (2006), जेनी आरएल (2006) आणि लेख केसी (2006) नंतर दुसरी जागतिक बॉक्सिंग चॅम्पियन (World Boxing Championship) बनली आहे. चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकणारी ती पाचवी भारतीय महिला ठरली आहे. दिग्गज बॉक्सर मेरी कोमच्या 2018 मधील विजेतेपदानंतर या प्रतिष्ठित जागतिक स्पर्धेत भारताचे हे पहिले सुवर्णपदक आहे.

पंतप्रधान मोदींनी केले अभिनंदन
महिला वर्ल्ड चॅम्पियनशिप फ्लायवेट (52 किलो) गटात सुवर्णपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बॉक्सर निखत जरीनचे अभिनंदन करताना म्हंटले कि तिने देशाचा गौरव केला आहे. सुवर्णपदक जिंकल्याबद्दल निखत झरीनचे अभिनंदन.’ तसेच ‘मी मनीषा मोन आणि परवीन हुड्डा यांचेही कांस्यपदक जिंकल्याबद्दल अभिनंदन करतो.’

पहिल्यापासून सामन्यावर पकड
25 वर्षीय भारतीय बॉक्सरने आपल्या उंच उंचीचा पुरेपूर फायदा घेत थायलंडच्या बॉक्सरविरुद्ध आपले वर्चस्व कायम राखले. 2019 च्या थायलंड ओपनच्या उपांत्य फेरीत निखतने जुटामासचा पराभव केला होता. तिने आताच्या सामन्यात पूर्णपणे वर्चस्व निर्माण केले होते. समोरच्याला प्रतिकार करण्याची कोणतीही संधी तिने दिली नाही.

निखतने स्वप्न पूर्ण केले
भारतीय बॉक्सिंग फेडरेशन (BFI) चे अध्यक्ष अजय सिंग म्हणाले की, जागतिक चॅम्पियनशिपसारख्या (World Boxing Championship) मोठ्या स्पर्धेत पदक जिंकणे हे नेहमीच एक स्वप्न असते आणि निखतने ते इतक्या लवकर मिळवणे कौतुकास्पद आहे. तिचा हा बॉक्सिंग प्रवास पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी असेल. भारतीय बॉक्सिंग फेडरेशन (BFI) च्या वतीने, मी निखत आणि कांस्यपदक विजेत्या परवीन आणि मनीषा तसेच प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफचे या कामगिरीबद्दल अभिनंदन करतो. मनीषा (57 किलो) आणि परवीन (63 किलो) वजनी गटात कांस्यपदक जिंकले. जगातील सर्वात मोठ्या बॉक्सिंग स्पर्धेत भारतीय संघाने आपल्या मोहिमेचा शेवट तीन पदकांसह केला.

हे पण वाचा :

तुमचा नगरसेवक असलेल्या एखाद्या वॉर्डात फिरुन दाखवा; खासदार जलील यांचे फडणवीसांना आव्हान

कुठे फेडाल ही पाप, वर गेल्यावर तुम्हांला नरकातच जावं लागेल : अजित पवार

…तर मुंबईला 26 जुलैच्या परिस्थितीची आठवण येईल की काय?; नितेश राणेंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

शेवटी भांड्याला भांडे हे लागणारच…; नाना पटोलेंच्या टीकेवर अजितदादांचे प्रत्युत्तर

अजित पवार पहाटेच्या शपथविधीवर कधी बोलणार?; नाना पटोलेंनी अजितदादांना डिवचलं

Leave a Comment