राणेंचं खळबळजनक ट्विट!! ज्या दिवशी महाराजांचा पुतळा कोसळला तेव्हा….

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मालवण मधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर महाराष्ट्राचे राजकारण चांगलंच तापलं आहे. विरोधी पक्ष याप्रकरणी सत्ताधाऱ्यांवर खापर फोडत आहेत. परवा राणे समर्थक आणि ठाकरे समर्थक यांच्यात राजकोट किल्ल्यावरच मोठा राडा सुद्धा पाहायला मिळाला. याप्रकरणी अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. मात्र भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी ट्विट करत खळबळ उडवून दिली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा पडल्यानंतर ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक (Vaibhav Patil) घटनास्थळी 15 मिनिटात कसे पोचले असा सवाल करत राणेंनी या सर्व घटनेवर वैभव नाईक यांच्यावरच संशय निर्माण केला आहे.

याबाबत निलेश राणे यांनी ट्विट करत म्हंटल, आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार ज्या दिवशी महाराजांचा पुतळा कोसळला तेव्हा उबाठा गटाचा आमदार वैभव नाईक हा पंधराव्या मिनिटात घटनास्थळी पोहोचला. आजूबाजूला कसलाही नियोजित कार्यक्रम नसताना आणि राहतं घर हे कणकवली शहरामध्ये जे 50 किलोमीटर लांब आहे, असं असताना घटनास्थळी पंधरा मिनिटात नाईक कसा पोहोचू शकतो??? जर काही यामधलं वैभव नाईक याने घडवलं असेल तर आत्ताच बोटीमध्ये बसून दुबई किंवा पाकिस्तानला जायची तयारी त्याने करून ठेवावी. निलेश राणे यांच्या या ट्विट नंतर आता वैभव नाईक काय प्रतिक्रिया देतात ते पाहायला हवं.

दरम्यान, राजकोट किल्ल्यावर राणे समर्थक आणि ठाकरे समर्थकांमध्ये झालेल्या संघर्षानंतर आपली पोलीस आणि गृखात्याकडून काहीही अपेक्षा नसल्याची प्रतिक्रिया नाईकांनी दिली होती. जोपर्यंत सरकार बदलणार नाही, तोपर्यंत दडपशाहीचं राजकारण सुरूच राहील असं सांगताना त्यांनी पुतळा उभारणी आणि अनावरण सोहळ्यादरम्यानच्या काळात कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचे गंभीर आरोप केले होते. शिवाची महाराजांचा पुतळ हा निकृष्ट कामामुळे कोसळला असून एक शिवप्रेमी म्हणून आम्ही याचा निषेध करतो. खरं तर ज्यावेळी हा पुतळा तयार करण्यात येत होता त्यावेळीच स्थानिक लोकांनी कामासंदर्भात तक्रारी केल्या होत्या मात्र जे विरोध करत आहे करत आहेत ते आपल्या विरोधात आहेत असं समजून पद्धतशीरपणे याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. 400 वर्षापूर्वी उभारण्यात आलेल्या किल्ल्याचा एकही चिरा ढासळला नाही, पण सहा महिन्यांपूर्वी येथील कम ढासळले होते. या प्रकरणी दोषींवर गुन्हे झाले पाहिजे अन्यथा आम्ही राज्यभर आंदोलन करु असा इशारा वैभव नाईक यांनी दिला होता.

याप्रकरणातील स्ट्रक्चरल कन्सल्टंट असलेला आरोपी चेतन पाटीलला पोलिसांनी अटक केली आहे. मात्र पुतळा उभारणारा शिल्पकार जयदीप आपटे हा अद्याप फरार असून त्याचाही पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. पण तो पळून पळून जाणार कुठे, तो देश सोडून तर जाऊ शकत नाही. त्याला लवकरच शोधलं जाईल. पुतळा उभारतानाा नेमकी काय चूक झाली, हे त्याच्याकडून जाणून घेतलं जाईल’, असे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले.