धरणमूत्र पवार ओकून गेले तरीही जिल्हा बँकेवर आमचाच झेंडा फडकला,राणेंची जहरी टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूकीत भाजपने बाजी मारली असून महाविकास आघाडीला धक्का बसला आहे. 19 जागेंसाठी झालेल्या या निवडणुकीत भाजपने 10 जागा जिंकत महाविकास आघाडीचा धुव्वा उडवला आहे. या विजयानंतर भाजप नेते निलेश राणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह महाविकास आघाडीवर जहरी टिका केली आहे.

धरणमूत्र पवार ओकून गेले, अख्खी चिवसेना ओकत होती पण सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर आमचाच झेंडा फडकला, कारस्थान करून निवडणूक जिंकता येईल असं वर्गणी चोरांना वाटतं होतं पण ही सिंधुदुर्गाची माती आहे इथे खरं करणाऱ्यालाच न्याय मिळतो. काळया विन्या राऊत तू बोलत रहा आमची निवडणूक सोप्पी होते.अस ट्विट करत राणेंनी महाविकास आघाडीवर जळजळीत टीका केली

दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूक अनेक प्रकरणानी गाजली होती. संतोष परब मारहाण आणि त्यावरून शिवसेना भाजपमध्ये तापलेले राजकारण यामुळे निवडणूकीत जोरदार चुरस निर्माण झाली होती. 19 जागेंसाठी झालेल्या या निवडणुकीत भाजपने 10 जागा जिंकल्या तर महाविकास आघाडीला फक्त 6 जागांवर समाधान मानावे लागले.

Leave a Comment