“मेव्हणा पकडल्यामुळे तडफड होत असल्यानेच मुख्यमंत्री घराबाहेर”; निलेश राणे यांची टीका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मेहुण्यावर ईडीने कारवाई केली असल्याने भाजप नेत्यांकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला जात आहे. दरम्यान आज भाजप नेते निलेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर खोचक टीका केली. “मागील दोन वर्षे कुणालाच मुख्यमंत्री दिसले नाहीत. मुख्यमंत्रीही असे मिळालेत की ज्यांना महाराष्ट्र कळला नाही. आता मेव्हणा पकडला गेला म्हणून तडफड आहे. इकडे मेव्हणा पकडला गेला आणि मुख्यमंत्री बाहेर आले, अशी टीका राणे केली आहे.

भाजप नेते तथा माजी खासदार किरीट सोमय्या उद्या दापोली येथे दौऱ्यावर येत आहेत. त्याच्या या दौऱ्याबाबत माहिती देण्यासाठी राणे यांनी आज माध्यमांशी संवाद असधला. यावेळी राणे म्हणाले की, “मागील अनेक दिवसांपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणाने कोणत्याही जाहीर कार्यक्रमांमध्ये तसेच बैठका आणि अधिवेशनातही उपस्थित नव्हते. मात्र सध्या सुरु असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात ते उपस्थित झालेत.

काल मुख्यमंत्र्यानी सभागृहात चांगले भाषण केले. मात्र, त्यांचे सभागृहातील भाषण हे अत्यंत रटाळ आणि कुजलेलं होते. ते विधानसभेतील मुख्यमंत्र्याचे भाषण नव्हते ते सेना भवनातलं भाषण होते. बाबासाहेबांच्या भाषणाची क्वालीटी मुख्यमंत्र्यामध्ये नाही. टोमणे मारणे म्हणजे मुख्यमंत्र्याचे भाषण नसते. विरोधीपक्ष नेते दवेंद्र फडणवीस यांनी चिरफाड केली. त्यात ते निरुत्तर झालेत. मुख्यमंत्र्यांनी लोकं टिंगल उडवायला लागलेत. मुख्यमंत्री मुख्यमंत्र्यासारखे बोलत नाही. ते दादरमध्ये असल्यासारखे बोलतात, अशी टीका राणे यांनी केली.

Leave a Comment