संजय राऊतांना काडीची किंमत कुठेच नाही; नाना पटोलेंच्या टीकेनंतर निलेश राणेंनी साधला निशाणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर कडक शब्दात टीका केली होती. संजय राऊतांना आम्ही गांभीर्याने घेत नाही असा टोला नाना पटोले यांनी लगावल्यानंतर भाजप नेते निलेश राणे यांनी पुन्हा नानांच्या विधानाचा आधार घेत राऊतांवर टीका केली.

नानांनी कचराच करून टाकला. आम्ही जिथे कमी पडलो ते काम नानांनी करून टाकलं. संज्या राऊतला काडीची किंमत कुठेच नाही. असेल हिम्मत शिवसेनेत तर उद्याचा सामन्यात किंव्हा एक तरी शिवसेनेच्या मंत्र्याने ह्यावर जशास तशी प्रतिक्रिया द्यावी. बघुया शिवसेनेची औकात किती उरली आहे. असे ट्विट निलेश राणे यांनी केले.

नक्की काय म्हणाले होते नाना पटोले –

संजय राऊत काय बोलतात याकडं आम्ही लक्ष देत नाही. तसंच सामना वाचणं आम्ही बंद केलं. खरं म्हणजे संजय राऊत हे नेहमीच इतरांवर टीका करत असतात. पण केवळ दुसऱ्यांवर टीका केल्याने आपला पक्ष वाढत नसतो, याची माहिती कदाचित राऊत यांना नसावी, अशी खोचक टीका पटोले यांनी केली.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

Leave a Comment